तामिळनाडू, केरळ आणि पुद्दूचेरी विधानसभा निवडणुकीसाठी आज (सोमवार) मतदान होत आहे. दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या प्रचार मोहिमा शनिवारी थंडावल्या असून प्रशासनाने निवडणुकीची सर्व तयारी केलेली आहे.
केरळमध्ये काँग्रेससह संयुक्त लोकशाही आघाडी पक्ष डाव्या लोकशाही आघाडी पक्षापेक्षा वरचढ ठरण्याची चिन्हे आहेत. त्याच वेळी नरेंद्र मोदी यांच्या केरळमध्ये कितपत पाठिंबा मिळणार हे पाहणेदेखील औत्सुक्याचे ठरणार आहे. केरळमधील २.६१ कोटी जनता १४० उमेदवारांची निवड करणार आहे. नुकतीच पश्चिम बंगालमध्ये झालेली निवडणुकीही डाव्या लोकशाही आघाडीसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. पश्चिम बंगालमध्ये डाव्या लोकशाही आघाडीने काँग्रेससोबत आघाडी केलेली आहे.
तामिळनाडूमध्ये अण्णा द्रमुक, द्रमुक- काँग्रेस, भाजप आघाडी यांच्यात चुरस रंगणार आहे. तामिळनाडूतील ५.७९ कोटी जनता २३४ उमेदवारांची निवड करणार आहे. अखिल भारतीय अण्णा द्रमुकच्या जयललिता यांनी जाहीरनाम्यात मतदारांवर आश्वासनांची खैरात केली आहे. तसेच त्यांची मुख्यमंत्रीपदाच्या काळातील केलेल्या विधायक कामांमुळे जयललिता यांच्या पक्षाच्या कामगिरीकडे साऱ्यांचेच लक्ष असेल.
उत्तरप्रदेशात जंगीपूर, बिलारी येथे आज मतदान
उत्तरप्रदेशातील जंगीपूर आणि बिलारी येथील पोटनिवणुकांसाठी सोमवारी मतदान होणार आहे. या दोन्ही मतदारसंघात समाजवादी पक्षाने विजय मिळविला होता. मात्र, कैलाश यादव (जंगीपूर) आणि हाजी इरफान (बिलारी) या दोघांचे निधन झाल्याने येथे पोटनिवडणुक होत आहे. इरफान यांचा अपघातात १० मार्च रोजी निधन झाले होते.

तामिळनाडूतील निवडणूक पुढे ढकलण्याची रामदोस यांची मागणी
मदुराई : द्रमुक आणि अण्णाद्रमुक हे दोन्ही पक्ष तामिळनाडू विधानसभेच्या सर्व २३४ मतदारसंघांमध्ये मतदारांना पैसे वाटत असल्याचा आरोप पीएमकेचे नेते एस. रामदोस यांनी केला असून, या पक्षाच्या उमेदवारांना अपात्र ठरवून सोमवारची निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. मतदारांना पैसेवाटपाच्या प्रकारामुळे निवडणूक आयोगाने अरावाकुरिची मतदारसंघातील निवडणूक पुढे ढकलली आहे. याचाच अर्थ, पैसे वाटले जात असल्याचे आयोगाने उघडपणे मान्य केले आहे. मात्र एकाच मतदारसंघातील निवडणूक पुढे ढकलून काही फायदा होणार नाही, असे सांगून निवडणूक जाहीर झाल्यापासून पैसेवाटपाच्या प्रकाराविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी रामदोस यांनी एका निवेदनात केली. सर्वच मतदारसंघांमध्ये पैसे वाटण्यात आलेले असल्याचा आरोप त्यांनी केला.

Buldhana Lok Sabha, queueless voting,
बुलढाणा लोकसभा निवडणुकीत यंदा ‘रांगविरहित मतदान’! काय आहे योजना जाणून घ्या…
Akola Lok Sabha constituency, MLA s Reputations at Stake , vidhan saba constituency, votes will Decisive, mp s Election, bjp, vanchit bahujan aghadi, congress, lok sabha 2024, election 2024,
अकोला : लोकसभा निवडणुकीत आमदारांची कसोटी, विधानसभा मतदारसंघनिहाय मतांचे गणित निर्णायक
BJP Candidate Tenth List
मोठी बातमी! लोकसभेसाठी भाजपा उमेदवारांची दहावी यादी जाहीर, कोणाला कोणत्या मतदारसंघातून संधी?
rebellion in Mahavikas Aghadi
भिवंडीत महाविकास आघाडीत बंडखोरी, काँग्रेसचे इच्छुक नीलेश सांबरे लढविणार निवडणूक