News Flash

हाथरस : तृणमूलच्या नेत्यांना पीडितेच्या कुटुंबीयांना भेटण्यापासून रोखलं; पोलिसांकडून धक्काबुकी

हाथरस प्रकरणाचे देशभरात पडसाद

तृणमूलच्या शिष्टमंडळाला भेट घेण्यापासून पोलिसांनी रोखलं. (छायाचित्र/इंडियन एक्स्प्रेस)

उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेचे देशभरात पडसाद उमटत आहेत. उत्तर प्रदेशातील कायदा व सुव्यवस्थेवरून राजकीय पक्ष आक्रमक झाले असून, पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांना भेटू दिलं नाही. त्यांच्यापाठोपाठ आज तृणमूल नेत्यांच्या शिष्टमंडळालाही उत्तर प्रदेश पोलिसांनी रोखलं आहे.

हाथरसमधील सामूहिक बलात्काराच्या घटनेनं देश ढवळून निघाला आहे. पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर तिच्यावर घाईघाईत अंत्यसंस्कार उरकरण्यात आले. या घटनेवरून संप्तप भावना व्यक्त होत आहे. उत्तर प्रदेश प्रशासनानं हाथरसमधील पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यापासून रोखण्याची भूमिका घेतल्यानं योगी सरकारवर टीका होऊ लागली आहे.

आणखी वाचा- हाथरस : “मुलगी करोनाने मेली असती तर नुकसानभरपाई सुद्धा नसती मिळाली”; जिल्हा दंडाधिकाऱ्यांचे धक्कादायक वक्तव्य

राहुल गांधी यांच्या पाठोपाठ आज तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांच्यासह पक्षाच्या शिष्टमंडळाला उत्तर प्रदेश पोलिसांनी भेट घेण्यापासून रोखलं. हाथरसच्या सीमेवरचं पोलिसांनी या शिष्टमंडळाला थांबवलं. मात्र, पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यावर तृणमूलचे खासदार ठाम राहिले. यावेळी पोलिसांकडून धक्काबुकी झाल्याचा प्रकार घडला. पोलिसांनी धक्का दिल्यानं खासदार डेरेक ओब्रायन खाली कोसळले.

“आम्ही पीडितेच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी जात होतो. पण आम्हाला परवानगी दिली गेली नाही. आम्ही भेटण्याचा आग्रह धरला. मात्र महिला पोलिसांनी आमच्या खासदार प्रतिमा मोंडल यांचे कपडे फाडले व लाठीचार्ज केला. त्या खाली कोसळल्या. पुरूष पोलिसांनीही त्यांना हात स्पर्श केला. हे लज्जास्पद आहे,” असा आरोप तृणमूलच्या नेत्या ममता ठाकून यांनी केला आहे.

आणखी वाचा- Hathras Case : “सफदरजंग रुग्णालयातील नंबर प्लेट नसलेल्या ‘त्या’ रुग्णवाहिकेचे रहस्य काय?”

आणखी वाचा- “कोणालाही घाबरणार नाही; कोणत्याही अन्यायासमोर झुकणार नाही”

काँग्रेसचे नेते राहुल गांधी व महासचिव प्रियंका गांधी यांनी १ ऑक्टोबर रोजी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोन्ही नेत्यांना कुटुंबीयांची भेट घेण्यापासून पोलिसांनी रोखलं. तसेच कलम १४४चं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हाही दाखल केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 2, 2020 1:28 pm

Web Title: tmc delegation hathras border derek obrien uttar pradesh police bmh 90
Next Stories
1 पाकिस्तानी लष्कराला कमकुवत करण्यासाठी नवाज शरीफांना भारताची मदत : इम्रान खान
2 नोटबंदीचा उद्देश अयशस्वी ?; आढळल्या २००० च्या सर्वाधिक बनावट नोटा
3 ऑनलाइन शिकवणीसाठी वडील स्मार्टफोन विकत घेण्यास असमर्थ, १४ वर्षीय मुलाने केली आत्महत्या
Just Now!
X