News Flash

टीएमसीच्या नेत्याने चक्क स्टेजवर काढल्या उठाबशा

पश्चिम बंगालमध्ये २७ मार्च ते २९ एप्रिल दरम्यान निवडणुका होणार आहेत

छायाचित्र सौजन्य: इंडियन एक्सप्रेस

पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या निवडणुकांमुळे राज्यातील राजकीय तापमान वाढले आहे. भाजपा आणि तृणमुल काँग्रेस यांच्यात दररोज काही ना काही विषयांवर वाद होताना दिसत आहेत. सुशांता पाल या टीएमसीच्या नेत्याने काल पश्चिम मिदनापूर येथे भाजपामध्ये प्रवेश केला. तृणमुल काँग्रेससोबत राहिल्यामुळे त्यांनी स्व:ताला शिक्षा करून घेतली. त्यांनी चक्क स्टेजवर कान पकडून उठाबशा काढल्या.

स्टेजवरील एका माणसाने जेव्हा त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते म्हणाले, “टीएमसीचा कार्यकर्ता म्हणून केलेल्या सर्व पापांचे प्रायश्चित म्हणून मी हे करत आहे. मी क्षमा मागत आहे आणि मी ही स्वतःला दिलेली ही एक छोटीशी शिक्षा आहे.”

ही घटना भाजप नेते आणि माजी टीएमसी मंत्री सुवेन्दु अधिकारी यांच्या उपस्थितीत घडली. पाल आधी भाजपामध्ये होते परंतु डाव्या आघाडीच्या सरकारला पराभूत करण्यासाठी त्यांनी २००५ साली टीएमसीमध्ये प्रवेश केला होता. एक दिवस अगोदरच पश्चिम बर्धमान जिल्ह्यातील पांडेश्वरचे टीएमसीचे आमदार आणि आसनसोलचे माजी महापौर जितेंद्र तिवारी यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 4, 2021 4:50 pm

Web Title: tmc leader joins bjp performs sit ups on stage sbi 84
Next Stories
1 “राहुल गांधी मंदबुद्धी तर प्रियंका कधी मंदिरात जातात तर कधी गळ्यात क्रॉस घालतात”
2 झारखंड – आयडी स्फोटात तीन जवान शहीद, दोन जखमी
3 ज्येष्ठांना दिलासा! खासगी रूग्णालयांना सर्वोच्च न्यायालयाने दिले आदेश
Just Now!
X