News Flash

टीएमसी आमदार हत्या : भाजपा नेते मुकुल रॉय यांच्याविरोधात एफआयआर

भाजपाचे नेते मुकुल रॉय यांच्यासह चार जणांविरोधात एफआयआर, दोघांना अटक

(भाजपा नेते मुकुल रॉय यांचं संग्रहित छायाचित्र )

पश्चिम बंगालच्या नदिया जिल्ह्यात शनिवारी रात्री तृणमूल काँग्रेसचे आमदार सत्यजीत बिश्वास यांची गोळ्या घालून हत्या करण्याता आली. याप्रकरणी भाजपाचे नेते मुकुल रॉय यांच्यासह चार जणांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. चारपैकी दोन जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याशिवाय हंसखली पोलीस स्थानकाचे ठाणेदार यांचंही निलंबन करण्यात आलं आहे.


सत्यजीत बिश्वास हे कृशनगर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. बिश्वास हे फुलबाडी परिसरात आयोजित सरस्वती पुजेच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेले होते. पुजा सुरू असतानाच त्यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्याची माहिती आहे. त्यांना तात्काळ शक्तिनगर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. परंतु, त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता, असे डॉक्टरांनी सांगितले.

दरम्यान, सत्यजीत यांची हत्या भाजपच्या सांगण्यावरून झाल्याचा गंभीर आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे. सत्यजीत यांच्या हत्येमागे भाजपच्या मुकूल रॉय यांचा हात असल्याचा आरोप तृणमूलचे जिल्हाध्यक्ष गिरीशंकर दत्ता यांनी केला आहे. तृणमूलमधील काही विश्वासघातकी लोकांनी भाजपच्या या कामासाठी मदत केल्याचा आरोपही तृणमूल काँग्रेसने ट्विटवरून केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2019 1:39 pm

Web Title: tmc mlas murder bjp leader mukul roy booked
Next Stories
1 जम्मू-काश्मीर : ५ दहशतवाद्यांना कंठस्नान, चकमकीत ८ नागरिकही जखमी
2 कुंभमेळा : ‘गंगेत स्नान करणा-या महिलांचे फोटो प्रसिद्ध करू नका’
3 पश्चिम बंगाल : तृणमूल काँग्रेसच्या आमदाराची गोळ्या झाडून हत्या
Just Now!
X