News Flash

”दुर्गापूजा करणे हा तर इस्लामचा अपमान”; नुसरत जहाँवर धर्मगुरू संतापले

तृणमूल काँग्रेसच्या खासदार व प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री नुसरत जहाँ पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत.

तृणमूल काँग्रेसच्या खासदार व प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री नुसरत जहाँ पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. दुर्गापूजेनिमित्त कोलकात्यातील दुर्गाभवन येथे पती निखिल जैनसोबत उपस्थित राहिलेल्या नुसरत यांच्यावर मुस्लीम धर्मगुरू नाराज झाले आहेत. नुसरतला धर्माबाहेर जायचे असेल तर तिने आधी आपले नाव बदलले पाहिजे, असे देवबंदी येथील उलेमांचे म्हणणे आहे.

दुर्गापूजा करतानाचे नुसरत यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यानंतर त्यांच्यावर चारही बाजूंनी टीका होऊ लागली आहे. नुसरत जहाँ ही इस्लामविरोधी काम करत असल्याचं देवबंदी उलेमांचे म्हणणे आहे. ”जर नुसरत जहाँला इस्लामच्या शिकवणीविरुद्ध जाणारी कामे करायची असतील तर तिने प्रथम आपले नाव बदलले पाहिजे. अशा प्रकारे वागून ती इस्लाम धर्माचा अपमान का करत आहे,” असा प्रश्न उलेमांनी विचारला आहे. नुसरतने यापूर्वीही पूजा केली आहे. अशाप्रकारच्या कृत्याला इस्लाम धर्मात बिलकूल परवानगी नाही, असे उलेमांनी स्पष्ट केले. या टीकांना न जुमानता नुसरत यांनी अशाप्रकारच्या वादांकडे लक्ष देत नसल्याचं सांगितलं. ”मला जे वाटतं तेच मी करते. अशा गोष्टींकडे मी लक्ष देत नाही,” असं त्या म्हणाल्या.

याआधीही हिंदू धर्माप्रमाणे कपाळावर कुंकू लावणे, तसेच लोकसभेत पाश्चिमात्य पेहरावात जाण्यावरून नुसरत यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. तेव्हासुद्धा त्यांनी तितक्याच आक्रमकपणे विरोधकांना उत्तरे दिली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 8, 2019 1:42 pm

Web Title: tmc mp nusrat jahan in firing line of muslim cleric for celebrating durga puja ssv 92
Next Stories
1 भारतीय हद्दीत पुन्हा एकदा पाकिस्तानी ड्रोन; BSF ला सतर्कतेचा इशारा
2 ‘ग्रुप कॅप्टन’ सचिनची हवाई दलाच्या कार्यक्रमात उपस्थिती
3 …म्हणून महिलांना वैतागलेल्या पुरुषांनी केली कुंभकर्णाची पूजा
Just Now!
X