News Flash

टीएमसीची निवणूक आयोगाला मतदानाच्या प्रक्रियेत लक्ष घालण्याची विनंती

मतदानाच्या अॅपमधील 'विसंगती' आणि 'ईव्हीएम बिघाड' यांसारख्या समस्यांसाठी आयोगाची घेणार भेट

(संग्रहित छायाचित्र)

निवणुक आयोगाच्या मतदानाच्या अॅपमध्ये मतदानाच्या टक्केवारीबद्दल काही विसंगती आढळल्यानंतर तृणमूल काँग्रेसने चिंता व्यक्त केली आहे. यासंदर्भात टीएमसीच्या नेत्यांचे एक प्रतिनिधीमंडळ शनिवारी दुपारी निवडणूक आयोगाची भेट घेणार आहे.

“काय होत आहे @ECISVEEP ?! मतदानाची टक्केवारी केवळ ५ मिनिटांमध्येच अर्ध्यावर कशी खाली आली हे आपण समजावून सांगाल का ?! धक्कादायक! @CEOWestBengal, कृपया तातडीने यात लक्ष घालावे! ” टीएमसीने निवडणूक आयोगाच्या मतदानाच्या अॅपचे दोन स्क्रीनशॉट देखील ट्वीट केले आहेत. त्यानुसार, पूर्बो मेदिनीपूर जिल्ह्यातील विधानसभा जागांवरील मतदान पाच मिनिटांत १० टक्क्यांनी कमी झालेले दिसत आहे.

सुदीप बंद्योपाध्याय आणि डेरेक ओ ब्रायन यांच्या नेतृत्वाखाली टीएमसीचे १० सदस्यीय संसदीय प्रतिनिधीमंडळ दुपारच्या सुमारास कोलकाता येथील निवडणूक आयोगाच्या कार्यालयाला भेट देणार आहेत. मतदानाच्या अॅपमधील कथित विसंगती आणि ईव्हीएम बिघाड इत्यादी प्रश्नांबद्दल ते आयोगाला भेट देणार आहेत.

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या आठ टप्प्यामधील पहिल्या टप्प्याचे मतदान होत आहे. ३० मतदारसंघांमधील मतदार मतदानाचा हक्क बजावत आहेत. मतांची मतमोजणी २ मे रोजी होईल. तिसर्‍यांदा बंगालच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्यासाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जीं उत्सुक आहेत तसेच भाजपाला २०० पेक्षा जास्त जागांवर बहुमत मिळवण्याचा विश्वास आहे. या कारणांमुळे ही निवडणूक महत्वाची झाल्याचे सांगितले जात आहे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 27, 2021 1:01 pm

Web Title: tmc to meet ec over voter turnout app discrepancy and evm malfunction sbi 84
Next Stories
1 जेव्हा शशी थरूर नरेंद्र मोदींना सॉरी म्हणतात…
2 करोना पुन्हा बळावतोय? भारतात गेल्या पाच महिन्यातील सर्वाधिक रुग्णवाढ
3 RTI अर्ज दाखल : मोदींना १९७१ साली कोणत्या कायद्याअंतर्गत अटक झाली?, त्यांना कोणत्या तुरुंगात ठेवलं होतं?
Just Now!
X