वंदे मातरम म्हणत नुसरत जहाँ रूही जैन यांनी लोकसभेतील सदस्य म्हणून शपथ घेतली. शपथ घेतली. यावेळी त्यांनी जय हिंद, वंदे मातरम आणि जय बांगला अशा तिन्ही घोषणा दिल्या. पश्चिम बंगालच्या बशीरहाट मतदारसंघातून निवडणूक लढवून त्या विजयी झाल्या. मात्र कोलकाता येथील व्यावसायिक निखील जैन यांच्यासोबत त्यांनी काही दिवसांपूर्वीच टर्कीमध्ये लग्न केले.

पाहा व्हिडिओ

सर्वात सुंदर खासदार असा किताब सोशल मीडियाने त्यांना दिला आहे. त्या लग्नासाठी टर्कीमध्ये असल्याने लोकसभेत खासदार जेव्हा सदस्यत्त्वाची शपथ घेत होते तेव्हा त्या तिथे हजर नव्हत्या. त्यांनी आज लोकसभेत हजेरी लावली. ज्यावेळी कामकाज सुरू करण्यापूर्वी त्यांनी सदस्यत्त्वाची शपथ घेतली. ही शपथ घेताना त्यांनी वंदे मातरम, जय हिंद आणि जय बांगला अशा तिन्ही घोषणा दिल्या.

लोकसभा निवडणूक निकालानंतर भाजपा आणि एनडीएचे ३५० पेक्षा जास्त खासदार लोकसभेत आहेत. त्यामुळे शपथविधी सोहळ्या दरम्यान जय श्रीराम, वंदे मातरम या घोषणा दिल्या गेल्या. जय श्रीरामच्या घोषणेला नवनीत कौर राणा यांनी विरोध दर्शवला तर असदुद्दीन ओवेसी यांनी वंदे मातरमच्या घोषणांना विरोध दर्शवला. यावेळी लोकसभेतील खासदारांनी जो सदस्यत्त्वाची जी शपथ घेतली तो सोहळाही गाजला.