धर्मपुरी येथे इलावरसन या दलित युवकाचा मृतदेह रेल्वेमार्गात सापडल्याने त्याच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करावी आणि त्याची पत्नी दिव्या हिला संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी शुक्रवारी विशेष उल्लेखाद्वारे मद्रास उच्च न्यायालयात करण्यात आली.दिव्या हिने याबाबत सदोष मनुष्यवधाची याचिका दाखल केली असून न्या. एम. जयचंद्रन आणि न्या. एम. एम. सुरेश यांच्या खंडपीठापुढे अ‍ॅड. वैगैई यांनी विशेष उल्लेखाद्वारे वरील मागणी केली.