फर्मान झुगारल्यास पाच वष्रे तुरूंगवास
बोíनओतील ब्रुनेई देशात ख्रिसमस साजरा करण्यावर अनधिकृतपणे बंदी घालण्यात आली आहे. ब्रुनेईच्या सुलतानाने त्या देशात कुणीही सांताक्लॉज टोप्या घालायच्या नाहीत, एकमेकांना शुभेच्छा संदेश पाठवायचे नाहीत असे फर्मान काढले आहे. आपल्या देशात इस्लाम वगळता इतर कुठल्याही देशाचा प्रसार होता कामा नये असे त्याचे म्हणणे आहे. पूर्व आशियातील हा देश मुस्लीमबहुल असून तेथे मुस्लिमांनी तेथे ख्रिसमस साजरा केला तर पाच वष्रे तुरूंगवासात जावे लागणार आहे.
ब्रुनेईत मुस्लिमेतरांची संख्या ३२ टक्के आहे व त्या देशाची लोकसंख्या ४ लाख २० हजार आहे. ख्रिश्चनांनी खासगी पातळीवर ख्रिसमस साजरा करण्यास आडकाठी केलेली नाही. पण मुस्लिमांनी ख्रिसमस उत्सवात भाग घेतला तर त्यांना शिक्षा होणार आहे. तेथील इमामांनी सरकारच्या आदेशाचे पालन करण्यास सांगितले आहे. मुस्लिमांनी ख्रिसमस साजरा केल्यास त्यांच्या धार्मिक श्रद्धा भ्रष्ट होतात असे त्यांचे म्हणणे आहे. ब्रुनेई टाइम्समध्ये सरकारी फतवा जारी करण्यात आला असून ख्रिसमस साजरा करण्याच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे, त्यामुळे अकिदा म्हणजे श्रद्धा नष्ट होत आहेत असे धार्मिक कामकाज मंत्रालयाने म्हटले आहे. ख्रिसमस साजरा करताना त्या धर्माचा प्रसार होऊ नये असा यामागील हेतू आहे. मुस्लिमांनी ख्रिसमसपासून दूर राहावे. दुकानांमध्ये ख्रिसमसची सजावट करू नये, सांताक्लॉजच्या टोप्या ठेवू नयेत, कपडे ठेवू नयेत असेही फतव्यात म्हटले आहे. ब्रुनेईत बुरखा न घालणाऱ्या स्त्रियांवर र्निबध नाहीत व अल्कोहोलवर बंदी घालण्यात आली आहे. ब्रुनेईचे सुलतान हसनाल बोलकिया हे जगातील श्रीमंत व्यक्ती असून त्यांनी गेल्या वर्षी त्यांच्या देशात शरियत कायदा लागू केला आहे. त्या वेळी त्यांच्या मालकीची जी हॉटेल्स अमेरिका, इंग्लंडमध्ये आहेत तेथे लोकांनी बहिष्कार टाकला होता. आताच्या मुस्लिमांना ख्रिसमस बंदीच्या आदेशाविरोधात ‘हॅश माय फ्रीडम’ ही मोहीम सोशल मीडियावर सुरू करण्यात आली आहे. इराण, सौदी अरेबिया व मुस्लीम देशातील लोकांनी तसेच ब्रुनेईतील लोकांनी ख्रिसमस साजरा करून त्याची छायाचित्रे या समाजमाध्यमांवर टाकावीत असे म्हटले आहे.