News Flash

विमानात ‘लगेज चार्ज’ चुकवण्यासाठी त्याने घातले १० पँट-शर्ट

त्या युवकाने मात्र वर्णभेदाचा आरोप केला आहे.

विमानात प्रवास करताना निश्चित वजनापेक्षा जास्त सामान घेऊन जायचे असेल तर वेगळे शूल्क द्यावे लागते. परंतु, या शूल्कापासून वाचण्यासाठी ब्रिटनच्या एका व्यक्तीने अनोखी शक्कल लढवली.

विमानात प्रवास करताना निश्चित वजनापेक्षा जास्त सामान घेऊन जायचे असेल तर वेगळे शूल्क द्यावे लागते. परंतु, या शूल्कापासून वाचण्यासाठी ब्रिटनच्या एका व्यक्तीने अनोखी शक्कल लढवली. पण ही कल्पना वास्तवात उतरली नाही. विमान अधिकाऱ्यांनी त्याची हुशारी त्वरीत ओळखली आणि त्याची योजना यशस्वी होऊ दिली नाही. ब्रिटनच्या रेयान कार्ने विलियम्सला आईसलँडवरून लंडनला यायचे होते. त्याच्याकडे सामान भरपूर असल्यामुळे अतिरिक्त शूल्कापासून वाचण्यासाठी त्याने तब्बल १० पँट आणि शर्ट परिधान केले. पण केफ्लाविक विमानतळावर ब्रिटिश एअरवेजच्या अधिकाऱ्यांनी त्याची ही हुशारी ओळखून त्याला बोर्डिंग पास देण्यास नकार दिला. पण या युवकाने मात्र हा वर्णभेदाचा प्रकार असून यामुळे आपण निराश झाल्याचे ट्विट केले.

ब्रिटिश एअरवेजच्या अधिकाऱ्यांनी रोखल्यानंतर रेयानने सोशल मीडियावर याची माहिती देत वर्णभेदाचा आरोप केला. पण ब्रिटिश एअरवेजने त्याचा आरोप फेटाळला असून रेयानची वर्तणूक चांगली नसल्याने त्याला बोर्डिंग पास नाकारल्याचे म्हटले. रेयानने विंडो सीट सोडण्यास नकार दिल्यानंतर सुरक्षा रक्षकांना बोलावून त्याला अटक करण्यात आली. त्याचा जबाब लिहून घेतल्यानंतर त्याला सोडूनही देण्यात आले.

रेयानने नंतर ईजी जेटच्या विमानाने लंडनला जाण्याचा प्रयत्न केला. पण त्याला तिथेही परवानगी मिळाली नाही. दोन दिवसांत विनाकारण मला दोन विमान कंपन्यांनी प्रवास करण्यास परवानगी दिली नाही, असे ट्विट केले. अखेरीस नॉर्वे एअरलाइन्सच्या विमानाने तो लंडनला पोहोचला. इतके कपडे परिधान करून विमान प्रवास करण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी स्कॉटलँडचा गायक जेम्स मॅकएल्वरने २०१५ मध्ये १२ कपडे परिधान करून लंडन ते ग्लासगोच्या विमानात प्रवास करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा त्याची शुद्ध हरपली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 18, 2018 9:12 am

Web Title: to escape the luggage charge form airways company he wear 10 paint shirt
Next Stories
1 पाकच्या गोळीबारात एक जवान शहीद; तीन नागरिक जखमी
2 बलात्कार हा समाजाचा एक भागच; अतिरिक्त पोलीस महासंचालकांचे वादग्रस्त विधान
3 डोकलामला ड्रॅगनचा विळखा
Just Now!
X