News Flash

…म्हणून काँग्रेसने आमदारांना राज्याबाहेर नेण्यासाठी फक्त शर्मा ट्रॅव्हल्सची केली निवड

एकनिष्ठता आणि विश्वास हे दोन शब्द सध्या कर्नाटकच्या राजकारणात अत्यंत महत्वाचे बनले आहेत. कुठल्याही परिस्थितीत आमदारांची फाटाफूट होऊ नये यासाठी काँग्रेस आणि जेडीएसकडून अत्यंत सावध

एकनिष्ठता आणि विश्वास हे दोन शब्द सध्या कर्नाटकच्या राजकारणात अत्यंत महत्वाचे बनले आहेत. कुठल्याही परिस्थितीत आमदारांची फाटाफूट होऊ नये यासाठी काँग्रेस आणि जेडीएसकडून अत्यंत सावध पावले उचलली जात आहेत. त्यासाठीच आपल्या आमदारांना राज्याबाहेर नेण्यासाठी काँग्रेस आणि जेडीएसने शर्मा ट्रॅव्हल्सची निवड केली. सध्या या दोन्ही पक्षांचे आमदार हैदराबादमध्ये आहेत.

हे सर्व आमदार म्हैसूर किंवा बंगळुरुहून चार्टर्ड प्लेनने केरळला रवाना होतील असा अंदाज होता. पण या सर्व आमदारांना विमानाऐवजी शर्मा ट्रॅव्हल्सच्या खासगी बसेसमधून हैदराबादला पोहोचवण्यात आले. शर्मा ट्रॅव्हल्सचे मालक दिवंगत डी.पी.शर्मा यांचे काँग्रेस नेतृत्वाबरोबर चांगले संबंध होते. मूळचे राजस्थानचे असणारे डी.पी.शर्मा १९८० च्या दशकात काँग्रेसमध्ये सक्रिय होते. १९९८ साली काँग्रेसच्या तिकिटावर त्यांनी दक्षिण बंगळुरुमधून निवडणूक सुद्धा लढवली होती. त्यावेळी अनंत कुमार यांनी त्यांचा दीड लाख मतांच्या फरकाने पराभव केला होता.

धनराज पारसमल शर्मा यांचे २००१ साली निधन झाले. काँग्रेसचे दिवगंत पंतप्रधान पी.व्ही.नरसिम्हा राव, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्याबरोबर त्यांचे उत्तम संबंध होते. दक्षिण भारतातील अनेक राज्यांमध्ये शर्मा ट्रॅव्हल्सच्या बसेस धावतात. पक्षाबरोबर घनिष्ठ संबंध असल्यानेच काँग्रेसने आपल्या आमदारांसाठी शर्मा ट्रॅव्हल्सची निवड केली. भाजपाकडून आमदारांच्या फोडाफोडीचा प्रयत्न होणार म्हणून काँग्रेस आणि जनता दल सेक्युलर या दोन्ही पक्षांकडून अत्यंत काळजी घेतली जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 18, 2018 3:27 pm

Web Title: to ferry karnataka mlas congress select this travel
टॅग : Siddaramaiah
Next Stories
1 परदेशवारीचा आनंद भारतातच घेण्यासाठी ही ट्रीप अनुभवाच!
2 राज्यपालांना पाठवलेल्या ‘त्या’ पत्रात १०४ व्यतिरिक्त अन्य एकाही आमदाराचे नाव नव्हते – सिद्धरामय्या
3 भाजपा आता सत्तेसाठी पैसा व बळाचा वापर करणार: राहुल गांधी
Just Now!
X