News Flash

महिला, संस्कृतीच्या रक्षणासाठी पुन्हा भाजपाला सत्तेत आणा; संतांचा ‘आशीर्वाद’

काही लोक सरकारविरोधात काम करत आहेत. सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आपणं हे प्रयत्न यशस्वी होऊ देऊ नये, असे आवाहन पुण्यातील संत गोविंददेव गिरी

अखिल भारतीय संत समितीचे दोन दिवसीय अधिवेशन दिल्लीत पार पडले.

अयोध्येत राम मंदिर झालेच पाहिजे, यासाठी केंद्र सरकारने अध्यादेश आणावा, अशी मागणी करतानाच महिला, संस्कृती- परंपरेचे रक्षण करण्यासाठी देशात २०१९ मध्ये पुन्हा भाजपाचेच सरकार सत्तेत आले पाहिजे, असे आवाहन अखिल भारतीय संत समितीने केले आहे. २०१९ मध्ये जनतेने गाय, गंगा, गीता, गायत्री आणि कृष्णावर श्रद्धा असलेल्यांना मतदान करावे, असे संत समितीने म्हटले आहे.

अखिल भारतीय संत समितीचे दोन दिवसीय अधिवेशन दिल्लीत पार पडले. या संमेलनात देशभरातील साधू – संत सहभागी झाले होते. समितीचे प्रमुख हंसदेवाचार्य यांनी सांगितले की, जर जिवंत राहायचं असेल, मठ- मंदिर वाचवायचे असतील, माता- भगिनी आणि संस्कृतीचे रक्षण करायचे असेल तर पुन्हा याच सरकारला सत्तेत आणायला हवे. साधू- संताच्या मागण्यांची पूर्तता अन्य कोणतेही सरकार करु शकत नाही, असेही त्यांनी सांगितले. राम मंदिराच्या कामाचा शुभारंभ होण्यास विलंब होत असल्याबद्दल त्यांनी नाराजीही व्यक्त केली. मात्र, केंद्र सरकारने देश, धर्म, संस्कृती, राष्ट्र सुरक्षा यासाठी केलेले काम समाधानकारक असल्याचेही त्यांनी सांगितले.

काही लोक सरकारविरोधात काम करत आहेत. सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आपणं हे प्रयत्न यशस्वी होऊ देऊ नये, असे आवाहन पुण्यातील संत गोविंददेव गिरी यांनी केले. राम मंदिरासाठी केंद्र सरकारने अध्यादेश आणावा, भाविकांसाठी तीर्थस्थान मंत्रालय तर गोरक्षेसाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना करावी, अशी मागणीही या प्रसंगी करण्यात आली. देशात घुसखोरी करणाऱ्या रोहिंग्या मुस्लिमांचा शोध घेऊन त्यांना पुन्हा मायदेशी पाठवावे, अशी मागणीही समितीने केली आहे.

‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ श्री श्री रविशंकरही या कार्यक्रमात उपस्थित होते. शबरीमला मंदिरात महिलांच्या प्रवाशबंदीला विरोध करणारे भक्त नाहीत, असे त्यांनी सांगितले. आपल्याकडे जेव्हा सूतक असतं किंवा महिलांची मासिक पाळी असते त्यावेळी त्या मंदिरात जात नाही. मशीद आणि गुरुद्वारांमध्येही असे काही नियम असतात, असे सांगत त्यांनी बंदीचे समर्थन केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 5, 2018 1:03 pm

Web Title: to save country culture bring back bjp in 2019 election akhil bharatiya sant samiti
Next Stories
1 संतापजनक ! शौचालयात सॅनिटरी पॅड सापडले, चौकशीसाठी विद्यार्थिनींना कपडे काढायला लावले
2 भाजपा नेत्याच्या कार्यकर्त्यांकडून गँगरेपची धमकी, काँग्रेस महिला सचिवाचा आरोप
3 अयोध्येत मशीद बांधल्यास हिंदू असहिष्णू होतील – उमा भारती
Just Now!
X