नव्या सीबीआय संचालकांची निवड करण्यासाठी उच्चस्तरीय निवड समितीची २४ जानेवारीला बैठक होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली निवड समिती नवा सीबीआय संचालक निवडणार आहे. भारताचे मुख्य न्यायमूर्ती आणि लोकसभेतील काँग्रेसचे नेते मल्लिकार्जून खर्गेंचा या निवड समितीमध्ये समावेश आहे. सरकारने २१ जानेवारीला बैठकीचा प्रस्तावर दिला होता. पण मल्लिकार्जून खर्गे यांना २४ किंवा २५ जानेवारीला बैठक हवी होती असे सूत्रांनी सांगितले. अखेर परस्परसहमतीने नव्या संचालकांची निवड करण्यासाठी २४ जानेवारीची तारीख ठरवण्यात आली. निवड समितीने आलोक वर्मा यांना हटवल्यापासून सीबीआय संचालकाचे पद रिक्त आहे. आयपीएस अधिकारी नागेश्वर राव सध्या हंगामी सीबीआय संचालक म्हणून कामकाज संभाळत आहेत. सीबीआय संचालकपद रिक्त ठेवल्याबद्दल काँग्रेसकडून मोदी सरकारवर टीका सुरु होती.