News Flash

कोविड योद्ध्यांसाठी एअर फोर्स करणार फ्लाय पास्ट, रुग्णालयांवर हेलिकॉप्टरमधून फुलांचा वर्षाव

करोना व्हायरसविरोधात लढणाऱ्या देशातील कोविड योद्ध्यांप्रती येत्या ३ मे रोजी तिन्ही सैन्य दलांकडून कृतज्ञता व्यक्त करण्यात  येणार आहे.

करोना व्हायरसविरोधात लढणाऱ्या देशातील कोविड योद्ध्यांप्रती येत्या ३ मे रोजी तिन्ही सैन्य दलांकडून कृतज्ञता व्यक्त करण्यात  येणार आहे. या योद्ध्यांमध्ये डॉक्टर, नर्सेस, आरोग्य कर्मचारी आणि पोलिसांचा समावेश होतो. इंडियन एअर फोर्सकडून फ्लाय पास्ट तर समुद्रात उभ्या असलेल्या भारतीय नौदलांच्या जहाजांवर विशेष रोषणाई करण्यात येणार आहे. करोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयांवर फुलांचा वर्षाव करण्यात येणार आहे. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बीपिन रावत यांनी शुक्रवारी संध्याकाळी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

केंद्रीय गृहमंत्रालयाकडून लॉकडाउनचा कालावधी आणखी दोन आठवडयासाठी वाढवण्यात येत असल्याचे जाहीर होण्याआधी ही घोषणा करण्यात आली. या पत्रकार परिषदेला सीडीएस बीपिन रावत यांच्यासोबत तिन्ही सैन्य दलांचे प्रमुखही उपस्थित होते. “प्रत्येक करोना वॉरिअर आणि आमच्या देशातील सर्व नागरिकांप्रती आम्ही कृतज्ञता व्यक्त करणार आहोत. ३ मे रोजी तिन्ही सैन्यदलांकडून विशेष कवायती सादर केल्या जातील” अशी माहिती सीडीएस रावत यांनी दिली.

‘जेव्हा देशाचा विषय असतो तेव्हा आपण सर्वांनी एकत्र राहिले पाहिजे. हे आपल्या देशात प्रत्येकाला समजते’ असे रावत म्हणाले. कोविड योद्ध्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी इंडियन एअर फोर्स काश्मीर ते कन्याकुमारी आणि आसाम ते गुजरात कच्छपर्यंत फ्लाय पास्ट करणार आहे. हेलिकॉप्टरमधून रुग्णालयांवर फुलांचा वर्षाव करण्यात येणार आहे आणि वैद्यकीय इमारतींबाहेर लष्कराचा विशेष बॅण्ड वाजवला जाईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 1, 2020 8:51 pm

Web Title: to thank covid 19 warriors on sunday air force do fly pasts dmp 82
टॅग : Coronavirus
Next Stories
1 ग्रीन झोनमध्ये ४ मेपासून वाइन शॉप्स आणि पानाची दुकानं सुरु करण्यास सशर्त संमती
2 रेड झोनमध्ये असलेल्या मुंबई-पुण्यात काय सुरु राहणार समजून घ्या…
3 Lockdown 3: कोणत्या झोनमध्ये कोणत्या गोष्टी सुरु राहणार आणि कोणत्या बंद?
Just Now!
X