27 September 2020

News Flash

अमेरिकेत आज मतदान

सकाळी ६ ते ७ च्या दरम्यान देशभरातील मतदान केंद्रे उघडतील आणि सायंकाळी ७ ते ८ वाजेपर्यंत मतदान होईल.

१२ कोटी नागरिक राष्ट्राध्यक्ष निवडीसाठी सज्ज

संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकीचा दिवस अखेर उजाडला असून मंगळवारी (८ नोव्हेंबर) स्थानिक वेळेनुसार सकाळी ६ ते ७ वाजण्याच्या सुमारास अमेरिकेत मतदानाला सुरुवात होईल. सुमारे १२ कोटी अमेरिकी मतदार जगातील सर्वात बलशाली नेत्याच्या निवडीसाठी आपला मतदानाचा अधिकार बजावतील.

सहा ‘टाइम झोन्स’मध्ये पसरलेल्या अमेरिकेतील ५० राज्ये आणि वॉशिंग्टन डीसी हा राजधानीचा विशेष मतदारसंघ अशा विस्तृत भूभागात अमेरिकेचा ४५ वा अध्यक्ष निवडण्यासाठी मतदानाची प्रक्रिया सुरू होईल. सकाळी ६ ते ७ च्या दरम्यान देशभरातील मतदान केंद्रे उघडतील आणि सायंकाळी ७ ते ८ वाजेपर्यंत मतदान होईल. तर आयोवा आणि उत्तर डकोटामध्ये मतदान रात्री ९ वाजेपर्यंत सुरू राहील. मतमोजणी लगेच बुधवारी (९ नोव्हेंबरला) होणार असली तरी विजयी उमेदवाराची अधिकृत घोषणा ६ जानेवारी २०१७ रोजी होईल.

प्रायमरीज आणि कॉकसेसच्या माध्यमातून होणारी राजकीय पक्षांची उमेदवार निवडीची प्रक्रिया, त्यानंतरच्या जाहीर चर्चेच्या तीन फेऱ्या, मतदार कौल चाचण्या, प्रचारासाठीची पार्टी कन्व्हेन्शन्स असा मोठा टप्पा पार करताना जगाची उत्कंठा शिगेला पोहोचली होती.  हिलरी क्लिंटन विजयी झाल्या तर त्या अमेरिकेच्या पहिला महिला अध्यक्ष ठरणार आहेत.

मंगळवारच का?

अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीच्या मतदानाचा दिवस ठरलेला असतो. नोव्हेंबर महिन्यातील पहिल्या सोमवारनंतरचा पहिला मंगळवार असा तो दिवस आहे. जेव्हा अमेरिका प्रामुख्याने शेतीवर आधारीत देश होता तेव्हा ही योजना करण्यात आली होती. नोव्हेंबर महिन्यात शेतीची कामे मंदावलेली असत. शेतकऱ्यांना ग्रामीण भागातून शहरी भागात मतदानासाठी  प्रवास करणे सोईचे व्हावे, रविवारी प्रवास करावा लागू नये म्हणून मंगळवार ठरवण्यात आला होता. नोव्हेंबरची १ तारीख टाळण्याचाही त्यातून प्रयत्न होता. त्या तारखेला ‘ऑल सेंट्स डे’ असतो आणि व्यापारी महिन्याचे हिशेब पूर्ण करतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 8, 2016 1:56 am

Web Title: today us presidential elections
Next Stories
1 मोदींची राजवट काळा अध्याय
2 हिलरींना पसंतीकौल!
3 भारतावर काय परिणाम?
Just Now!
X