कर्नाटकातील उडुपी येथे ९ मार्चला होणाऱ्या ‘हिंदू समाजोत्सव’ मिरवणुकीसाठी या जिल्ह्य़ात प्रवेश करण्यास विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रवीण तोगडिया यांना प्रशासनाने बंदी घातली आहे.
तोगडिया यांच्या प्रक्षोभक भाषणामुळे धार्मिक ऐक्य भंग होऊ नये, तसेच कायदा व सुव्यवस्थेची स्थिती बिघडू नये या उद्देशाने जिल्हा प्रशासन आणि पोलीस यांनी ही बंदी घातली असल्याचे जिल्ह्य़ाचे उपायुक्त विशाल आर यांनी सांगितले. तोगडिया यांनी ७ ते १३ मार्च या कालावधीत कुठल्याही जाहीर सभेत किंवा कार्यक्रमात उपस्थित राहू नये, असा आदेश त्यांना देण्यात आला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 8, 2015 1:36 am