18 January 2019

News Flash

अमेरिकेत टॉलिवूड अभिनेत्रींचे सेक्स रॅकेट चालवणाऱ्या भारतीय जोडप्याला अटक

टॉलिवूड अभिनेत्रींचे अमेरिकेत सेक्स रॅकेट चालवत असल्या प्रकरणी अमेरिकन पोलिसांनी शिकागो येथे राहणाऱ्या भारतीय वंशाच्या जोडप्याला अटक केली आहे.

टॉलिवूड अभिनेत्रींचे अमेरिकेत सेक्स रॅकेट चालवत असल्या प्रकरणी अमेरिकन पोलिसांनी शिकागो येथे राहणाऱ्या भारतीय वंशाच्या जोडप्याला अटक केली आहे. शिकागोच्या कोर्टात ४२ पानी तक्रार दाखल झाल्यानंतर त्या आधारावर तपास करण्यात आला असे शिकागो ट्रीब्युनच्या वृत्तात म्हटले आहे. किशन मोदुगुमुडी उर्फ श्रीराज चोन्नूपत्ती (३४) आणि त्याची पत्नी चंद्रा (३१) हे शो च्या बहाण्याने टॉलिवूड अभिनेत्रींना अमेरिकेत बोलवून त्यांना सेक्स रॅकेटमध्ये ढकलत होते. तामिळ आणि तेलगु चित्रपट सृष्टीला टॉलिवूड म्हटले जाते.

या जोडप्यावर पीडित मुलींना त्रास दिल्याचा आरोप आहे. किशनची अमेरिकेत उद्योगपती अशी ओळख असून त्याने काही तेलगु चित्रपटांचीही निर्मिती केली आहे. या जोडप्याची शिकार ठरलेल्या एका मुलीने चिठ्ठी लिहिली होती. त्या चिठ्ठीच्या स्वरुपात तपासकर्त्यांना पुरावा सापडला. मला एकटीला सोडून द्या, मला त्रास देऊ नका असे त्या चिठ्ठीत लिहिले होते.

सेक्स रॅकेट चालवताना हे जोडपे प्रत्येक डेटसाठी तीन हजार अमेरिकन डॉलर्स आकारायचे. शो आणि कार्यक्रमाच्या निमत्ताने या अभिनेत्रींना अमेरिकेत आणले जायचे. या जोडप्यांचे बहुतांश ग्राहक अमेरिकेत होणाऱ्या भारतीय कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हायचे. पोलिसांनी जेव्हा किशन आणि चंद्राच्या घरी धाड टाकली तेव्हा त्यांना तिथे वेगवेगळया बॅगेमध्ये ७० कंडोम सापडले. त्यांनी घरात एक नोंदवही ठेवली होती. त्या वहीमध्ये अभिनेत्रींची सर्व माहिती होती. हे जोडपे सध्या तुरुंगात असून त्यांना जामीन मिळालेला नाही.

First Published on June 14, 2018 8:10 pm

Web Title: tollywood sex racket us indian couple arrested