27 February 2021

News Flash

टोनी ब्लेअर यांची ब्रेग्झिटसाठी पुन्हा सार्वमताची मागणी

ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांनी ब्रेग्झिटच्या मुद्दय़ावर पुन्हा सार्वमत घेण्याची मागणी केली आहे.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांनी ब्रेग्झिटच्या मुद्दय़ावर पुन्हा सार्वमत घेण्याची मागणी केली आहे. विद्यमान ब्रिटिश पंतप्रधान थेरेसा मे ब्रेग्झिट करारावर पार्लमेंटमध्ये बहुमत मिळवण्याच्या स्थितीत दिसत नाहीत. त्यामुळे निर्माण होणारा गोंधळ टाळण्यासाठी ब्रेग्झिटच्या मूळ विषयावर पुन्हा सार्वमत घेतले जावे, असे ब्लेअर यांनी म्हटले आहे.

ब्रेग्झिटच्या विषयावर आपण आता नव्या वळणावर पोहोचलो आहोत. आता या विषयावरील पुढाकार सरकारच्या हाती राहिला नसून सूत्रे पार्लमेंटच्या हाती गेली आहेत. पण पार्लमेंटही त्यावर निर्णय घेऊ शकली नाही तर तो निर्णय लोकांना घ्यावा लागेल, असे ब्लेअर म्हणाले.

दरम्यान, थेरेसा मे यांचे अद्याप कराराला पाठिंबा मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच युरोपीय महासंघाच्या नेत्यांच्या भेटी घेऊन अधिक सवलती मिळवम्याचा प्रयत्न करत आहेत. युरोपीय महासंघाच्या नेत्यांनी आर्यलडच्या सीमेच्या मुद्दय़ावर काही ठोस आश्वासने दिली तर त्या पार्लमेंटला मतदानासाठी तयार करू शकतील असे म्हणणे त्यांनी मांडले. मात्र ते युरोपीय महासंघाच्या नेत्यांना पटलेले दिसले नाही.

ब्रिटिश पार्लमेंटमध्ये मतदान होऊन ब्रेग्झिट काराराबाबत निर्णय होण्यास आता खूप कमी अवधी राहिला आहे. वेळेत निर्णय झाला नाही तर ब्रिटनला युरोपीय महासांघसा करार न करताच महासंघातून बाहेर पडावे लागेल, असे मत युरोपीय महासंघाच्या नेत्यांनी व्यक्त केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 15, 2018 12:55 am

Web Title: tony blair on brexit
Next Stories
1 राफेल विमान खरेदी निर्णयाचा प्रवास..
2 बुलंदशहर हिंसाचार : 18 फरार आरोपींचं छायाचित्र जारी
3 राहुल गांधी सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठे आहेत काय?
Just Now!
X