मॅकडोनल्ड कं पनीच्या हॅम्बर्गरमध्ये दंतभरण पदार्थ सापडल्याची घटना नुकतीच जपानमध्ये घडली असून त्यामुळे अन्न उद्योगातील कंपनीच्या प्रतिमेस धक्का बसला आहे. या वृत्तास मॅकडोनाल्डने दुजोरा दिला असून खाद्यपदार्थामध्ये अनेक बाह्य़ वस्तू आढळल्याचे मान्य करण्यात आले आहे. ओसाका येथे फ्रेंच फ्राईजच्या पातेल्यातही मानवी दात सापडला.
अज्ञात महिलेने असाही टेलिव्हिजन नेटवर्कला सांगितले की, दंतभरणासारखे तीन तुकडे हॅम्बर्गरमध्ये आढळले व ते आपण सप्टेंबरमध्ये उत्तर कुशिरो येथील मॅकडोनल्डच्या दुकानातून खरेदी केले होते. सुरूवातीला तो वाळूचा खडा असावा असे वाटले पण तपासणीत तो दाताचा भाग असल्याचे दिसून आले, असे कंपनीच्या प्रवक्तया मिवा यामामोटो यांनी सांगितले. दंतभरणासाठी वापरल्या जाणाऱ्या पदार्थाचे ते तुकडे होते.