11 August 2020

News Flash

#AbdulKalam: डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे दहा स्फूर्तिदायक विचार!

माजी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांची भाषणे नेहमीच प्रेरणादायी असत. यांच्या भाषणातील अनेक विचार चांगलेच लोकप्रिय झाले होते.

कलाम यांचे दहा स्फूर्तिदायक विचार!

माजी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांची भाषणे नेहमीच प्रेरणादायी असत. त्यांच्या भाषणातील अनेक विचार चांगलेच लोकप्रिय झाले होते. यापैकी काही निवडक विचार लोकसत्ताच्या वाचकांसाठी.

* आपण झोपेत पाहतो ते खरं स्वप्न नसतं, तर आपली झोप उडवतं ते खरं स्वप्न असतं.

*देशात सर्वाधिक बुद्धिमत्ता असलेल्या व्यक्ती शक्यतो वर्गातील शेवटच्या बाकावरचं सापडतात.

* तुमच्या पहिल्या विजयानंतर विश्रांती घेऊ नका. कारण, दुसऱ्या प्रयत्नात तुम्ही अयशस्वी झालात तर तुमचा पहिला विजय केवळ नशीबाचा भाग होता, असे म्हणायला अनेकजण सज्ज असतात.

* जेव्हा पाऊस सुरू होतो तेव्हा सर्व पक्षी घरट्यात आसरा घेतात. मात्र, गरूड पावसापासून बचाव करण्यासाठी ढगांवरून उडतो.

* यशाबद्दलची माझी निष्ठा कणखर असेल तर मला अपयशामुळे कधीच नैराश्य येणार नाही.

* यशाचा आनंद अनुभवण्यासाठी व्यक्तीला आयुष्यात अडचणींची सामना करणे आवश्यक असते.

* स्वप्न खरी होण्यासाठी स्वप्नं पाहणं गरजेचं आहे.

* एखाद्याचा पराभव करणे फार सोपे असते. मात्र, एखाद्याला जिंकणे खूपचं अवघड असते.

* आपण आपल्या वर्तमानातील गोष्टींचा त्याग करून जेणेकरून आपल्या मुलांचं भविष्य उत्तम होईल.

* स्वप्ने पहा, त्या दिशेने विचार करा व ती कृतीने सत्यात उतरवा.

* संकुचित ध्येय बाळगू नका. महान विचारदृष्टी समोर ठेऊन परिश्रम केले तर आपला देश निश्चितपणे एक विकसित राष्ट्र बनेल.

* य़शस्वी कथा वाचू नका, त्यांनी केवळ संदेश मिळतो. अपयशाच्या कथा वाचा, त्याने यशस्वी होण्यासाठी कल्पना मिळतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 27, 2018 10:36 am

Web Title: top 10 a p j abdul kalam quotes
Next Stories
1 ‘मी गृहमंत्री असतो तर बुद्धिजीवींना गोळ्या घालण्याचा आदेश दिला असता’
2 अबू सालेम ‘संजू’ला कोर्टात खेचणार
3 आमच्या ‘मुल्क’शी असलेलं नातं सुधारण्यात तुम्हाला यश मिळो- ऋषी कपूर
Just Now!
X