21 April 2019

News Flash

मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या

अमेरिकेतील निवडणुकीत नागपूरकर धोपटे विजयी आणि अन्य महत्त्वाच्या बातम्या

अमेरिकेतील निवडणुकीत नागपूरकर धोपटे विजयी
नोकरी, व्यवसायासाठी अमेरिकत गेलेले भारतीय विविध क्षेत्रात भरारी घेत असतानाच आता मूळचे नागपूरकर श्रीकांत धोपटे यांनी ‘टाऊनशिप कमिटी’च्या निडवणुकीत विजय प्राप्त करून अमेरिकेत राजकीय प्रवासाला प्रारंभ केला आहे. ते नागपूर जिल्ह्य़ातील खापा येथील रहिवासी आहेत. वाचा सविस्तर

भारतमाता पुन्हा ओवाळणार नाही; राज ठाकरेंचा मोदींवर निशाणा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिवाळीनिमित्त काढलेल्या सहाव्या व्यंगचित्रातून पुन्हा एकदा मोदी सरकारवर टीका केली आहे. २०१४ मध्ये खोटी आश्वासनं देऊन भाजपाने सत्ता मिळवली. पण २०१९ मध्ये तसं होणार नाही, ‘भारतमाता’ पुन्हा मोदींना ओवाळणार नाही, असे राज ठाकरेंनी व्यंगचित्रातून म्हटले आहे. वाचा सविस्तर

‘त्या’ वाघिणीला याआधीच ठार मारायला हवे होते!

पांढरकवडय़ातील टी-१ वाघिणीला ठार मारल्यावर त्याविरोधात वन्यजीवप्रेमी ओरड करीत असले तरी त्या वाघिणीपासून असणारा धोका लक्षात घेता तिला यापूर्वीच मारायला पाहिजे होते. तसे झाले असते तर १३ बळी गेले नसते, असे मत काँग्रेसचे माजी मंत्री अ‍ॅड. शिवाजीराव मोघे, वसंत पुरके यांनी व्यक्त केले आहे.
वाचा सविस्तर

पोलीस उपनिरीक्षक चिडे हत्याप्रकरणी पाच आरोपींना अटक

पोलीस उपनिरीक्षक छत्रपती चिडे हत्याप्रकरणी नागभीड पोलिसांना एकूण १३ पैकी पाच आरोपींना अटक करण्यात यश आले आहे. सर्व आरोपी लगतच्या गडचिरोली जिल्हय़ातील असून आज ब्रह्मपुरी न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. वाचा सविस्तर

विराट कोहलीने मौन तोडले; ट्रोलर्सना दिले सडेतोड उत्तर
क्रिकेटच्या चाहत्यांना देशातून निघून जाण्याचा सल्ला देण्यावरुन सोशल मीडियामध्ये ट्रोल झालेला टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याने अखेर आपले मौन तोडले आहे. ट्विटरवरुन ट्रोल करणाऱ्यांना त्याने सडेतोड उत्तर दिले आहे. तसेच आपल्या वक्तव्याबाबत त्याने स्पष्टीकरणही दिले आहे.
वाचा सविस्तर

First Published on November 9, 2018 9:38 am

Web Title: top 5 morning bulletine important news