१. 33rd Pune international marathon : इथिओपियाचा अटलाव डेबेड विजेता
३३वी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा आज (रविवार) उत्साहत पार पडली. यामध्ये नेहमीप्रमाणेच अफ्रिकन खेळाडूंचे वर्चस्व राहिले. इथोपियाचा धावपटू अटलाव डेबेड हा या स्पर्धेचा विजेता ठरला. त्याने ४२ किलो मीटरची मुख्य फुल मॅरेथॉन स्पर्धा जिंकली. यामध्ये एकूण १५ हजार स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. यामध्ये १०२ परदेशी स्पर्धकांचा समावेश आहे. वाचा सविस्तर :

२. एमटीएनएल वेतनाचा तिढा कायम!
‘महानगर टेलिफोन निगम’च्या कर्मचाऱ्यांच्या नोव्हेंबर महिन्याच्या वेतनाचा तिढा अद्याप कायम असून वेतन कधी मिळणार याबाबत व्यवस्थापनाकडून काहीही उत्तर दिले जात नसल्यामुळे कर्मचारी संतप्त झाले आहेत. प्रतिनियुक्तीवर असलेल्या टेलिफोन निगमच्याच कर्मचाऱ्यांसाठी दूरसंचार विभागाने ४२ कोटी रुपये दिले आहेत. मात्र निगमच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत दूरसंचार खाते गप्प आहे. वाचा सविस्तर :

३. मराठा आरक्षण खासगी उद्योगांतही?
राज्यातील शासकीय-निमशासकीय सेवेतील पदांबरोबरच शासनाच्या विविध प्रकारच्या आर्थिक सवलती घेणाऱ्या खासगी उद्योगांनाही मराठा आरक्षण कायदा लागू होणार आहे. उद्योग वा आस्थापनांना काही सवलती देत असताना किंवा कराराचे नूतनीकरण करताना, मराठा आरक्षण लागू करण्याची अट घालण्याची तरतूद या कायद्यात करण्यात आली आहे. वाचा सविस्तर :

४. मुंबईतील वीजबिलांवरून राजकीय स्टंटबाजी
राज्य वीज नियामक आयोगाने सप्टेंबर २०१८ मध्ये मंजूर केलेल्या वीजदरवाढीवरून मुंबईत राजकीय पक्षांचा निवडणूक वर्षांत होणारा पंचवार्षिक जागरण गोंधळ सुरू झाला आहे. मुंबईत अदानी इलेक्ट्रिसिटीला लक्ष्य करत काँग्रेस-मनसेने वीजग्राहकांसाठी आंदोलन केले. त्यानंतर शिवसेनेने विधान परिषदेत दरवाढीचा विषय करत ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून चौकशीचे आश्वासनही मिळवले. वाचा सविस्तर :  

५.‘प्रादेशिक चित्रपट ही संकल्पना नष्ट होईल’
सतीश राजवाडे दिग्दर्शित ‘मुंबई-पुणे-मुंबई’ चित्रपटातील स्वप्निलने साकारलेला गौतम लोकांना भलताच आवडला. आता गौतमच्या प्रेमाची पुढील गोष्ट ‘मुंबई-पुणे-मुंबई ३’ मधून पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आनंदात असलेला स्वप्निल कुठलीही कलाकृती यशस्वी होण्यासाठी त्याचं लेखन हा महत्त्वाचा भाग आहे, असे मानतो. चित्रपटाचा आत्मा आणि गाभा हे लेखन आहे. वाचा सविस्तर :