१. दहशतवाद कनेक्शन! औरंगाबादमधून एक डॉक्टर एटीएसच्या ताब्यात
औरंगाबादच्या खुलताबादमधून एका डॉक्टरला एटीएसने ताब्यात घेतले आहे. हा डॉक्टर काश्मीरमधील काही दहशतवाद्यांच्या संपर्कात असल्याचा संशय आहे. मागच्या दोन ते तीन दिवसांपासून या डॉक्टरची एटीएसकडून चौकशी सुरु होती. वाचा सविस्तर :

२. पाकिस्तानी लष्कराच्या ड्रोनवर कारवाई
भारतीय वायुदलाच्या सुखोई-३० विमानाने सोमवारी भारत-पाकिस्तान सीमेवरील राजस्थानच्या बिकानेर सेक्टरमध्ये हवेतून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राच्या साहाय्याने पाकिस्तानचे एक लष्करी ड्रोन पाडल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली. वाचा सविस्तर :

३. भारताची वर्चस्वासाठी लढाई!
सलामीच्या लढतीत पाहुण्या ऑस्ट्रेलियाला चारीमुंडय़ा चीत केल्यानंतर आता मंगळवारी नागपूरच्या जामठा स्टेडियमवर होणारा दुसरा एकदिवसीय सामना भारतीय संघासाठी आव्हानात्मक असेल. त्यामुळे मालिकेवरील पकड मजबूत करण्याच्या इराद्याने आत्मविश्वास उंचावलेल्या भारतीय संघाला वर्चस्वासाठी लढावे लागणार आहे. वाचा सविस्तर :

४.विश्वचषकात मोहम्मद शमी भारताचा हुकुमाचा एक्का ठरेल – आशिष नेहरा
वन-डे विश्वचषक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेला असताना, भारतीय संघाची निवड हा अजुनही कळीचा मुद्दा ठरला आहे. संघात पर्यायी गोलंदाज, पर्यायी सलामीवीर म्हणून कोणाला जागा मिळणार याबाबत अजुनही संभ्रम आहे. मात्र गेल्या काही महिन्यांमध्ये भारतीय गोलंदाज अतिशय चांगल्या फॉर्मात आहेत. वाचा सविस्तर :

५. बालाकोट : दहशतवादी तळांमध्ये सक्रिय होते 300 फोन, NTRO सर्व्हिलन्सचा दावा
किती दहशतवादी एअर स्ट्राईकमध्ये मारले गेले त्याचे पुरावे द्या अशी मागणी काँग्रेसकडून होत असतानाच NTRO च्या सर्व्हिलन्सने असा दावा केला आहे की बालाकोटमध्ये असलेल्या दहशतवादी तळांमध्ये 300 मोबाईल सक्रिय होते. गुप्तचर संस्थने ही माहिती दिल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे.  वाचा सविस्तर :