१. ….तर नाटकात काम करणार नाही-सुबोध भावे
नाटक सुरु असताना प्रेक्षकांचे मोबाईल वाजणं ही बाब नवी राहिलेली नाही. अभिनेते विक्रम गोखले, अभिनेता सुमित राघवन यांच्यासह अनेक कलाकरांनी याबाबत नाराजीही व्यक्त केली आहे. आता अभिनेता सुबोध भावेनेही नाटकाच्या प्रयोगादरम्यान वाजणाऱ्या मोबाईलबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. इतकंच नाही तर मोबाईल प्रयोगादरम्यान असेच वाजणार असतील तर आपण नाटकात काम करणं बंद करु असंही सुबोध भावेने म्हटलं आहे. वाचा सविस्तर :

२.काश्मीरमध्ये स्वातंत्र्यदिनी दहशतवादी हल्ल्याचा कट?
जम्मू-काश्मीरमध्ये स्वातंत्र्यदिनी दहशतवादी हल्ला घडवून आणण्याचा कट पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा ISI ने रचला आहे. हा कट उद्धवस्त करण्यासाठीच काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर सैन्याचा फौजफाटा तैनात करण्यात आल्याचे भारतीय गुप्तचर यंत्रणेतील एका बड्या अधिकाऱ्याने सांगितले आहे. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे. वाचा सविस्तर :

३.सलाम! शहीद मेजर कौस्तुभ रावराणेंची पत्नी लष्करात होणार दाखल
कोकणचे सुपत्र शहीद मेजर कौस्तुभ राणे यांची पत्नी कनिका रावराणे यांची लष्करात जाण्याची इच्छा पूर्ण झाली आहे. कनिका यांनी लष्कर आधिकारी पदाच्या परीक्षेत यश मिळवले आहे. ऑक्टोबर महिन्यात चेन्नई येथे त्यांच्या प्रशिक्षणाला सुरूवात होणार आहे. पतीचे अर्धवट स्वप्न पूर्ण करण्यासाठी कनिका लष्करात दाखल होणार आहेत. वाचा सविस्तर : 

शहीद मेजर कौस्तुभ रावराणे

४.राष्ट्रीय स्पर्धेचे विजेतेपद मिळवण्याचे ध्येय!
राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेचे विजेतेपद मिळवले असले तरी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धामध्ये मला नेहमीच निराशा पत्करावी लागली आहे. त्यामुळे आता सर्वप्रथम राष्ट्रीय विजेतेपद मिळवण्याचे ध्येय मी डोळ्यांसमोर ठेवले आहे, अशी प्रतिक्रिया भारताचा कॅरमपटू मोहम्मद घुफ्रानने व्यक्त केली. वाचा सविस्तर :

५. कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र आणि अरबी समुद्रातील वाऱ्यांचा वाढलेला वेग याचा परिणाम म्हणून कोकणासह मुंबई आणि परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. रविवारी पावसाने काही प्रमाणात विश्रांती घेतली असली, तरी सोमवारी (२९ जुलै) आणि मंगळवारी (३० जुलै) कोकणासह मुंबई, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे. वाचा सविस्तर :