१. मुलगी आणि कुटुंबीयांना धमकी, अनुराग कश्यपने डिलीट केलं ट्विटर अकाऊंट
सोशल मीडियावरील ‘कॉन्ट्रोव्हर्सी किंग’ अशी ओळख असलेला दिग्दर्शक अनुराग कश्यपने त्याचं अधिकृत ट्विटर अकाऊंट डिलीट केलं आहे. अनेक वेळा वादग्रस्त वक्तव्य करुन चर्चेत राहिलेल्या अनुरागच्या आई-वडीलांना आणि मुलीला सतत धमकीचे फोन,मेसेज येत असल्यामुळे त्याने हा निर्णय घेतला आहे. वाचा सविस्तर : 

२.रत्नाकर गुट्टेंच्या संपत्तीवर बँकांचा ताबा, १७३७ कोटींची थकबाकी
गंगाखेड शुगर कर्ज प्रकरणात अटकेत असलेले रत्नाकर गुट्टे यांच्या सुनील हायटेक या कंपनीकडे १७३७ कोटी ६३ लाख ३० हजार २०२ रुपयांचे कर्ज थकीत असल्याची नोटीस युको बँकेने प्रसिद्धीस दिली आहे. विशेष म्हणजे हे कर्ज वसूल करण्यासाठी गुट्टे आणि त्यांच्या कुटुंबीयांची परळी आणि गंगाखेडमधील संपत्ती ताब्यात घेण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. वाचा सविस्तर : 

३.जम्मू-काश्मीरच्या पाच जिल्ह्यातील प्रतिबंधात्मक आदेश मागे
जम्मू-काश्मीरच्या पाच जिल्ह्यंत लागू केलेले प्रतिबंधात्मक आदेश शनिवारी मागे घेण्यात आले. त्याचबरोबर दोडा आणि किश्तवार जिल्ह्यतील संचारबंदीही शिथिल करण्यात आली. प्रतिबंधात्मक आदेश मागे घेतल्याने पाचही जिल्ह्यंतील दैनंदिन व्यवहार सुरळीत झाल्याची माहिती सरकारी अधिकाऱ्यांनी दिली.वाचा सविस्तर : 

४.सायना, सिंधू भिडणार!
भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू पुढील आठवडय़ात स्वित्र्झलडमधील बसेल येथे रंगणाऱ्या जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत एकमेकींशी भिडणार आहेत. जागतिक बॅडमिंटन महासंघाने या स्पर्धेच्या महिला एकेरीच्या वेळापत्रकात बदल केल्यामुळे सायना आणि सिंधूचा एकाच गटात समावेश करण्यात आला आहे. वाचा सविस्तर : 

५.अतिवृष्टीने १८ हजार हेक्टर शेतीचे नुकसान
रायगड जिल्ह्याला गेल्या दहा दिवसांत अतिवृष्टीचा तडाखा बसला. जिल्ह्यातील अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली. या अतिवृष्टीने जिल्ह्यातील १ हजार ११६ गावे बाधित झाली. यात १८ हजार ५९५ हेक्टर शेतीचे नुकसान झाले. भात शेतीबरोबरच आंबा बागायतींना अतिवृष्टीचा तडाखा बसला. वाचा सविस्तर