29 September 2020

News Flash

मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या

वाचा सकाळच्या महत्वाच्या बातम्या

टॉप ५

१. भारताकडून बांगलादेशी वाघांची शिकार, आशिया चषकावर भारताची ‘सत्ता’!
आशिया चषकाच्या महामुकाबल्यामध्ये भारताने बांगलादेशचा ३ गडी राखून पराभव केला. आशिया चषकाचं भारताचं हे सातवं विजेतेपद ठरलं. २२३ धावसंख्येचा पाठलाग करताना भारताचा डाव मधल्या षटकांमध्ये काहीसा गडबडला. पण अखेरच्या षटकांमध्ये भुवनेश्वर कुमार आणि रविंद्र जाडेजाने केलेल्या निर्णायक भागिदारीच्या जोरावर भारताने चषकावर नाव कोरले. सामन्यात शतकी खेळी करणाऱ्या बांगलादेशच्या लिटन दासला सामनावीराचा तर मालिकेत धावांचा रतीब घालणाऱ्या शिखर धवनला मालिकावीराचा किताब देऊन गौरवण्यात आलं. वाचा सविस्तर :

२. भाजपचे राज्य आल्यापासून अनैतिकता, भ्रष्टाचाराला उघड मान्यताच – शिवसेना
व्यभिचार हा गुन्हा ठरवणारे कलम ४९७ रद्द करण्याचा ऐतिहासिक निकाल नुकताच सुप्रीम कोर्टाने दिला. पती हा पत्नीचा मालक नसल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले. त्यामुळे व्यभिचार हा गुन्हा ठरु शकत नाही. पण जर एखाद्या व्यक्तीने जोडीदाराच्या विवाहबाह्य संबंधांमुळे आत्महत्या केली, तर मात्र आत्महत्येस प्रवृत्त केल्याबाबत तो गुन्हा ठरू शकतो, असेही कोर्टाने स्पष्ट केले. सुप्रीम कोर्टाच्या या निकालामुळे देशभरात संमिश्र प्रतिकिया उमटल्या. मात्र शिवसेनेने याबाबत भाजपच्या राज्यकर्त्यांवर सडकून टीका केली आहे. वाचा सविस्तर :

३. नक्षलवादाचे समर्थक उघडे पडले – फडणवीस
शहरी माओवाद्यांविरोधात पुणे पोलिसांनी केलेली कारवाई योग्य होती यावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. देशाच्या ग्रामीण-आदिवासी भागात हिंसाचार करणाऱ्या नक्षलवादी लोकांचे व त्यांच्या बंदी घातलेल्या संघटनांचे समर्थक म्हणून ही मंडळी शहरात काम करत होती ही साखळीही सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट झाली आहे. देशात अराजक पसरवण्यासाठी जाती-जातींमध्ये विद्वेष पसरवणारे, देशाविरोधात कट रचणारे गजाआड जातील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. वाचा सविस्तर :

४. भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील नजरकैदेचा घटनाक्रम
भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणात महाराष्ट्र पोलिसांनी ज्या पाच कार्यकर्त्यांना अटक केली आहे त्यांना अजून चार आठवडे नजरकैदेतच राहावे लागणार असून त्यांच्या विरोधातील पुराव्यांची शहानिशा करण्यासाठी संयुक्त चौकशी पथक नेमले जाणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केले आहे. वाचा सविस्तर :

५. समाजाच्या आधारामुळेच जगण्याची उमेद!
लातूरजवळील किल्लारी परिसरात बसलेल्या भूकंपाच्या धक्क्याला येत्या रविवारी २५ वर्षे पूर्ण होत असून, भूकंपानंतर सामाजिक, आर्थिक असे विविध संदर्भ बदलले. याच वेळी भूकंपग्रस्तांच्या मदतीला हजारोंचे हात आले अन् भूकंपग्रस्तांच्या नव्या पिढीला जीवनाची नवी आशा दिली गेली. वाचा सविस्तर :

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 29, 2018 8:36 am

Web Title: top five morning news bulletin asia cup 2018 india vs bangladesh final
Next Stories
1 पेट्रोल-डिझेल आज पुन्हा महागले; नागरिकांसाठी महागाईची झळ कायम
2 पुरुषी मानसिकतेवर आधारित महिला प्रवेश बंदी अवैध – सरन्यायाधीश
3 तरुण पिढीने मातृभाषेकडे वळावे!
Just Now!
X