19 September 2020

News Flash

मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या

वाचा सकाळच्या महत्वाच्या बातम्या

१. सलग सहाव्या दिवशी सांगली, कोल्हापुरात पुराचा कहर
सलग सहाव्या दिवशी सांगली आणि कोल्हापुरात पुराचा कहर सुरुच आहे. आत्तापर्यंत दोन लाखांपेक्षा जास्त लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. लष्कर आणि नौदलाच्या पथकातर्फे पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येतं आहे. ग्रामिण भागात जनतेचे प्रचंड हाल होत आहेत. कोल्हापुरात कालपासून दीड फूट पाणी कमी झालं आहे. मात्र पावसाची संततधार सुरुच आहे त्यामुळे लोकांना संकटांचा सामना करावा लागतो आहे. वाचा सविस्तर : 

२. कोल्हापूर, सांगली पूरग्रस्तांसाठी अ.भा.मराठी नाट्य परिषदेचा मदतीचा हात
कोल्हापूर आणि सांगलीमध्ये सलग सहाव्या दिवशी पुराचा कहर सुरु आहे. आतापर्यंत येथून दोन लाखांपेक्षा जास्त लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. लष्कर आणि नौदलाच्या पथकातर्फे पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे सर्वतोपरीने प्रयत्न करत आहेत. तर प्रशासन, सामाजिक संस्था, अन्य जिल्ह्यातील नागरिक आणि मराठी चित्रपटसृष्टीतील काही कलाकार या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. यामध्ये आता अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळानेदेखील मदतीचा हात पुढे केला आहे. वाचा सविस्तर : 

३. बिल्डर लॉबीच्या ‘धनरेषे’पायी पंचगंगेची पूररेषा धोक्यात!
कोणत्याही नदीची पातळी पूररेषेपर्यंत वाढू लागली की नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची तसेच मदतकार्याच्या सज्जतेची प्रक्रिया वेगाने सुरू करता येते. पण पंचगंगेची ‘पूररेषा’ ही बिल्डर लॉबीच्या ‘धनरेषे’नुसार आखली गेल्याने आणि तिला राजकीय वरदहस्त लाभल्याने कोल्हापूरकरांची महापुरात मोठी वाताहत झाल्याचे भीषण वास्तव उघडकीस येत आहे.वाचा सविस्तर :

४. बॅलेट बॉक्स नाही, ‘ईव्हीएम’वरच निवडणुका होणार -निवडणूक आयुक्त
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह विरोधकांकडून ईव्हीएम मशिन सदोष असल्याचा आरोप करत पुन्हा बॅलेट बॉक्स आणण्याची मागणी केली जात आहे. मात्र, ईव्हीएमच्या जागी परत बॅलेट बॉक्स आणणार नाही, असे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी स्पष्ट केले आहे. वाचा सविस्तर :

५. ‘नाडा’पुढे ‘बीसीसीआय’ नमले!
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) अखेरीस राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्थेच्या (नाडा) अखत्यारीत आले आहे. या महत्त्वाच्या निर्णयासह ‘बीसीसीआय’ने राष्ट्रीय क्रीडा महासंघाचा दर्जा प्राप्त करण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकले आहे. वाचा सविस्तर : 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 10, 2019 9:42 am

Web Title: top five morning news bulletin bcci finally come under nada ssj 93
Next Stories
1 बॅलेट बॉक्स नाही, ‘ईव्हीएम’वरच निवडणुका होणार -निवडणूक आयुक्त
2 काश्मीरबाबत अमेरिकेच्या धोरणात बदल नाही
3 केरळात पावसाचे २२ बळी
Just Now!
X