1. भाजपाकडून आज बंगाल बंदची घोषणा, समर्थकांचा हिंसाचार
भाजपाने आज 12 तासांच्या बंगाल बंदची घोषणा दिली आहे. इस्लामपूर परिसरात शिक्षकांच्या नियुक्तीविरोधात आंदोलन करताना झालेल्या दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूचा निषेध करण्यासाठी हा बंद पुकारण्यात आला आहे. आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. दरम्यान बंद सुरळीत पार पडावा यासाठी तृणमूल काँग्रेसने कंट्रोल रुम्स उभे केले असून रस्त्यांवर जवळपास चार हजार पोलीस कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आलं आहे. वाचा सविस्तर

2. म्हाडाच्या चार हजार इमारतींचा पुनर्विकास मार्गी!
मुंबईच्या विकास आराखड्याला अंतिम मंजुरी मिळाल्यामुळे ‘महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणा’अंतर्गत (म्हाडा) मुंबईतील सुमारे चार हजार सहकारी गृहनिर्माण संस्थांमधील दीड लाख घरांच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे पुनर्विकासाला गती येऊन मोठ्या प्रमाणात परवडणारी घरे निर्माण होतील, असा विश्वास म्हाडाचे उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर व्यक्त केला. वाचा सविस्तर

3. येस बँकेचे रिझव्‍‌र्ह बँकेला आव्हान

रिझव्‍‌र्ह बँकेकडून मुख्य कार्यकारी अधिकारीपदी राहण्याला पाच महिने मिळालेल्या परवानगीलाच येस बँकेचे राणा कपूर यांनी आव्हान दिले आहे. नवा उत्तराधिकारी शोधण्यास वेळ मिळावा असे कारण देत कपूर हे किमान एप्रिल २०१९ पर्यंत बँकेच्या प्रमुखपदी कायम राहतील, असा ठरावच बँकेच्या संचालक मंडळाने मंगळवारी मंजूर केला. वाचा

4. टोलवसुलीतून भरघोस महसूल जमवता, मग खड्डे का बुजवत नाहीत?

मुंबई आणि नजीकच्या परिसरात दरवर्षी पावसाळ्यात रस्त्यांची दुरावस्था ही आता नित्यनियमाचीच झालेली आहे. गेल्या २५ वर्षांपासून हे चित्र बदलेले नाही, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला मंगळवारी धारेवर धरले. त्याच वेळी या महामार्गावर दररोज भरघोस प्रमाणात टोलची वसुली केली जात असताना त्यातील पैशांतून रस्त्यांची देखभाल केली जात नाही, खड्डे का बुजवले जात नाही, असा संतप्त सवालही न्यायालयाने सरकारला केला. वाचा सविस्तर

5. अन् कुलदीपवर भडकला धोनी

माजी कर्णधार एम.एस धोनीची कॅप्टन कूल ही इमेज आपण सर्वच जाणून आहोत. आपल्या याच स्वभावाने धोनीने आतापर्यंत भारताला अनेक सामने जिंकवून दिले आहेत. मात्र भारताचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादवला पुन्हा एकदा धोनीच्या रागाचा सामना करावा लागलेला आहे. अफगाणीस्तान संघ फलंदाजी करत असताना १७ व्या षटकांत कुलदीप यादवमुळे धोनीचा पारा अचानक चढला. वाचा सविस्तर