१. अयोध्येत तणाव! उद्धव ठाकरेंना दाखवणार काळे झेंडे
भव्य राम मंदिर उभारणीच्या मागणीसाठी येत्या २५ नोव्हेंबरला शिवसेनेसह अन्य हिंदुत्ववादी संघटना अयोध्येमध्ये एकत्र येणार आहेत. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अयोध्येमध्ये तणाव वाढत चालला असून व्यापारी वर्गाच्या मनात भितीची भावना आहे. विश्व हिंदू परिषदेने गुरुवारी मनाई हुकुम झुगारुन देत रविवारी होणाऱ्या धर्म सभेला पाठिंबा मिळवण्यासाठी अयोध्येमध्ये रोड शो केला. वाचा सविस्तर :

२. देशात पेट्रोल पंपांच्या अवाजवी विस्तारामुळे व्यवसाय धोक्यात
देशातील पेट्रोल पंपांची संख्या दुप्पट करण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेमुळे संपूर्ण व्यवसायच धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल या सार्वजनिक क्षेत्रतील तीन तेल कंपन्यांचे मिळून देशात सध्या एकूण सुमारे ५६ हजार पेट्रोल पंप आहेत. वाचा सविस्तर :

(संग्रहित छायाचित्र)

३.WWT20 : विंडीजवर मात करुन ऑस्ट्रेलियन महिलांची अंतिम फेरीत धडक
यजमान विंडीजला पराभवाचा धक्का देत ऑस्ट्रेलियन महिला संघाने कॅरेबियन बेटांवर सुरु असलेल्या टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. ७१ धावांनी विजय मिळवत ऑस्ट्रेलियाने अंतिम फेरीतलं आपलं तिकीट नक्की केलं. या विजयासह ऑस्ट्रेलियाने दोन वर्षांपूर्वी टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत विंडीजकडून स्विकाराव्या लागलेल्या पराभवाचाही बदला घेतला. वाचा सविस्तर :

 

४.हॉटेल-पबची सुरक्षाविषयक माहिती ऑनलाइन उपलब्ध करा!
शहरातील कोणती हॉटेल्स, पब, रेस्टॉरंट परवानाधारक आहेत, त्यामध्ये अग्निशमन सुरक्षा व्यवस्था आहे की नाही याची माहिती सर्वसामान्यांना असणे गरजेचे आहे. त्यामुळेच ही माहिती संकेतस्थळ आणि मोबाईल अ‍ॅपवरून लोकांसाठी उपलब्ध करण्याची सूचना उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला गुरूवारी केली. कमला मिल आगीच्या घटनेचा धडा म्हणून हे करणे आवश्यक असल्याचेही न्यायालयाने म्हटले. वाचा सविस्तर :

५. कोळीवाडे, गावठाणांबाबत लवकरच स्वतंत्र धोरण!
मुंबईसाठी जारी करण्यात आलेल्या नव्या विकास नियमावलीत कोळीवाडे आणि गावठणांना स्थान देण्यात आले नसले तरी या संदर्भात स्वतंत्र धोरण जारी करण्याचा राज्य शासनाचा मानस असल्याचे सूत्रांनी सांगितले. कोळीवाडे आणि गावठणांना समूह पुनर्विकास लागू होऊन त्यामुळे चार इतके चटई क्षेत्रफळही उपलब्ध होऊ शकते, याकडे लक्ष वेधण्यात आले आहे. कोळीवाडे आणि गावठणांसाठी किमान अडीच इतके चटई क्षेत्रफळ उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणीही केली जात आहे. वाचा सविस्तर :