03 March 2021

News Flash

मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या

वाचा सकाळच्या महत्वाच्या बातम्या

१. जुंपली! रामदास कदम म्हणजे उद्धव ठाकरेंनी पाळलेलं कुत्रं, नितेश राणेंचं प्रत्युत्तर
‘नारायण राणे म्हणजे कोकणाला लागलेला काळा डाग आहे, हा डाग धुतल्याशिवाय राहणार नाही’ अशी झोंबणारी टीका राज्याचे पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेता रामदास कदम यांनी केली होती. अपेक्षेप्रमाणे या टीकेला आमदार नितेश राणेंनी प्रत्युत्तर देताना रामदास कदमांची तुलना थेट कुत्र्यासोबत केली आहे. वाचा सविस्तर :

२. २०१९ मध्ये सुट्ट्यांची मज्जा कायम, पण सरकारी कर्मचाऱ्यांना फटका
२०१८ च्या अखेरचा प्रवास सुरू झाला आहे. २०१९ सुरू होण्यास फक्त १५ दिवस बाकी आहेत. अनेक जणांना २०१९चे वेधही लागले असतील. नववर्षात फिरायला जाण्याचं किंवा लग्नाकार्याचं प्लानिंग करायचं असेल, तर सुट्ट्या पाहणं मस्टच! यंदाच्या वर्षात रविवारी आलेल्या सार्वजनिक सुट्यांमुळे रजेच्या नियोजनाला कात्री लागली असली, तरी २०१९ मध्ये त्याची कसर भरून निघणार आहे. वाचा सविस्तर : 

३. अॅरेंज- मॅरेज मूर्खपणाच, हे बंद झाले पाहिजे: तस्लिमा नसरिन
अॅरेंज- मॅरेज हा मूर्खपणाच असून हे बंद झाले पाहिजे, असे मत वादग्रस्त लेखिका तस्लिमा नसरिन यांनी व्यक्त केले आहे. लग्न हे प्रेमाच्या आधारेच केले पाहिजे आणि तरुण पिढीला त्यांच्या आवडीनुसार लग्न करण्याची मुभा दिली पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे. वाचा सविस्तर :

४. व्यापारातून शेजारी देशांशी संबंध सुधारावेत
काश्मिरी जनतेला विश्वासात न घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या जनतेचा भ्रमनिरास केला, असा आरोप जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी शुक्रवारी मुंबईत ऑब्जव्‍‌र्हर रिसर्च फाऊंडेशनच्या कार्यक्रमात बोलताना केला. काश्मीर खोऱ्यातील देशाच्या सीमा प्रायोगिक तत्त्वावर मर्यादित खुल्या करून शेजारी देशांशी मुक्त आर्थिक, व्यापारी व सामाजिक संबंध ठेवून काश्मीर प्रश्न सोडवावा, अशी सूचनाही त्यांनी केली. वाचा सविस्तर :

५. आरोपींच्या फायद्यासाठी तपासात विलंब?
आरोपींना पळवाटांचा फायदा मिळावा, या उद्देशाने अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास हेतुत: संथगतीने केला जात आहे का, असा सवाल करत सीबीआयच्या तपासावर उच्च न्यायालयाने शुक्रवारी प्रश्नचिन्ह लावले. वाचा सविस्तर :

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 15, 2018 9:57 am

Web Title: top five morning news bulletin bombay high court on cbi 2
Next Stories
1 ‘या’ देशात भारतीय नोटांवर बंदी
2 अरेंज- मॅरेज मूर्खपणाच, हे बंद झाले पाहिजे: तस्लिमा नसरिन
3 Video : नागरिकांना गोहत्या रोखण्याची शपथ देतायेत पोलीस
Just Now!
X