१. ज्या राज्यात माणसेही नीट जगू शकत नाहीत तिथे वाघिणीचे काय?-शिवसेना
अवनी या वाघिणीची शिकार करण्यात आल्याच्या मुद्द्यावरून आता शिवसेनेने आक्रमक होत सरकारवर टीका केली आहे. वाघिणीला नरभक्षक ठरवून तिला ठार करण्यात आले. ज्यावरून बराच वाद सुरु आहे. अशात आता शिवसेनेनेही वाघिणीला भ्याड हल्ला करून ठार केल्याचे म्हटले आहे. वाचा सविस्तर :

२. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत पुन्हा कपात
पेट्रोलचे प्रति लिटर दर नव्वदी पार करणार का? तर डिझेलचे दर प्रतिलिटर ८० ते ८५ रुपयांचा आकडा गाठणार का? असा प्रश्न सामान्य जनतेला पडलेला असतानाच गेल्या पंधरा दिवसांपासून या दरांमध्ये कपात बघायला मिळते आहे. आजही पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाले आहेत. पेट्रोलचे दर प्रति लिटर २२ पैशांनी तर डिझेलचे दर २१ पैशांनी कमी झाले आहेत. मुंबईत पेट्रोलचा दर हा ८४ रुपये ६ पैसे असेल तर डिझेलचा दर ७६ रुपये ६७ पैसे असेल. वाचा सविस्तर :

३. पावसाची शक्यता कायम
कोकणामध्ये चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाल्याने पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे रविवारी कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला. मराठवाडय़ात हलक्या सरी बरसल्या. राज्यभर सध्या ढगाळ वातावरण राहत असल्याने उकाडय़ात वाढ झाली आहे. पुढील दोन ते तीन दिवस मध्य महाराष्ट्र, कोकण विभागात दुपारनंतर मेघगर्जनेसह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. वाचा सविस्तर :

४. महाराष्ट्राच्या जवानाला हेरगिरीप्रकरणी अटक
सीमेवरील कुंपण आणि रस्ते यांच्या छायाचित्रांसारखी गोपनीय माहिती पाकिस्तानच्या ‘आयएसआय’ या गुप्तहेर संघटनेच्या एजंटला पुरवल्याप्रकरणी सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानाला अटक करण्यात आली आहे. शेख रियाझुद्दीन असे त्याचे नाव असून, तो मूळचा महाराष्ट्रातील जालन्याचा आहे. वाचा सविस्तर :

संशयित जवान हा लातूर जिल्ह्यातील रेणापूरचा रहिवासी असून शेख रियाजुद्दीन असे त्याचे नाव असल्याचे सांगण्यात येते.

५. विराटच क्रिकेटचा सम्राट!
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या विलक्षण कामगिरीमुळे विश्वाच्या कानाकोपऱ्यातून त्याच्यावर कौतुकांचा वर्षांव होत आहे. त्यामध्ये आता वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपटू ब्रायन लारा या महान फलंदाजाचीदेखील भर पडली आहे. सध्याच्या घडीला फक्त कोहलीच क्रिकेटचा सम्राट आहे, अशा शब्दांत लाराने कोहलीची प्रशंसा केली आहे. वाचा सविस्तर :