मध्य रेल्वेवर आज सहा तासांचा विशेष ब्लॉक
कल्याणचा सर्वात जुना पत्रीपूल पाडण्यासाठी मध्य रेल्वेवर रविवारी सहा तासांच विशेष ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. परिणामी डोंबिवली ते कल्याणदरम्यानच्या लोकल सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय १४० लोकल फेऱ्या रद्द केल्या आहेत. काही मेल-एक्स्प्रेस गाडय़ांचे वेळापत्रकही बदलण्यात आले आहे. गरज असेल तरच प्रवास करण्याचे आवाहन रेल्वेने केले आहे. वाचा सविस्तर :

२. WWT20 IND vs AUS : स्मृतीचा ऑस्ट्रेलियाला तडाखा; गुणतक्त्यात भारत अव्वल
ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात भारतीय महिला संघाने ४८ धावांनी विजय मिळवला. उपकर्णधार स्मृती मानधनाच्या ८३ आणि कर्णधार हरमनप्रीत कौरच्या तडाखेबाज ४३ धावांच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियापुढे १६८ धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संघ ९ बाद ११९ धावांपर्यंतच मजल मारू शकला. वाचा सविस्तर :

३. मराठा-धनगर आरक्षण, दुष्काळ केंद्रस्थानी
मुंबईत सोमवारपासून राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा आरक्षणासंबंधीचा अहवाल केल्याने तसेच राज्यातील १५१ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करून राज्य सरकारने विरोधकांच्या भात्यातील बाण काढून घेतले आहेत. तरीही मराठा, धनगर, मुस्लीम आरक्षण, दुष्काळ, जलयुक्त शिवार योजनेतील कथित गैरव्यवहार, शेतकरी कर्जमाफीतील गोंधळ इत्यादी प्रश्नांवर विरोधी पक्ष सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न करतील. सत्ताधारी पक्षांकडूनही त्याला चोख प्रत्युत्तर देण्याची तयारी करण्यात आली आहे. वाचा सविस्तर :

४. ओला, उबरचालक पुन्हा संपावर
मागण्या मान्य न झाल्याने ओला, उबर चालकांनी शनिवार (१७ नोव्हेंबर) रात्री ११ वाजल्यापासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला. ओला-उबर चालक सोमवारी सकाळी १० वाजता भारतमाता ते विधान भवन असा मोर्चा काढणार आहेत. ओला, उबर चालकांचा दिवाळीपूर्वी बारा दिवस सुरू राहिलेला संप परिवहन विभागाशी झालेल्या चर्चेनंतर १५ नोव्हेंबपर्यंत स्थागित करण्यात आला होता. वाचा सविस्तर :

५. मकरंद देशपांडे यांचे ‘एपिक गडबड’ लवकरच मराठी रंगभूमीवर
आपल्या लेखणीतून, दिग्दर्शनातून आणि अभिनयातून रंगभूमीवर सतत प्रयोग करत रसिक प्रेक्षकांना नवे काही देण्यासाठी धडपडणाऱ्या मकरंद देशपांडे यांचे ‘एपिक गडबड’ हे लोकप्रिय नाटक पहिल्यांदाच व्यावसायिक मराठी रंगभूमीवर सादर होणार आहे. २९ नोव्हेंबर रोजी दीनानाथ नाटय़गृहात दुपारी ४ वाजता ‘एपिक गडबड’चा प्रयोग रंगणार असून मकरंद देशपांडे यांचे हे पहिले मराठी व्यावसायिक नाटक आहे. वाचा सविस्तर :

(संग्रहित छायाचित्र)