१.CRPF तळावरील हल्ल्याच्या मास्टरमाईंडला UAE ने दिले भारताच्या ताब्यात
संयुक्त अरब अमिरातीने जैश-ए-मोहम्मदच्या एका दहशतवाद्याला भारताकडे सोपवले आहे. निसार अहमद तांत्रे या जैशच्या दहशतवाद्याला रविवारी विशेष विमानाने दिल्लीला आणणण्यात आले. तिथून त्याला राष्ट्रीय तपास यंत्रणेने ताब्यात घेतले. डिसेंबर २०१७ मध्ये सीआरपीएफच्या जम्मू-काश्मीरमधील लीथपोरा येथील तळावर दहशतवादी हल्ला झाला होता. निसार अहमद या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार होता. वाचा सविस्तर : 

२.काँग्रेसची १० वी यादी जाहीर ; अमित शाहंच्या विरोधात उमेदवाराची घोषणा
लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेस पक्षातर्फे २० उमेदवारांची १०वी यादी जाहीर केली आहे. दहाव्या यादीमध्ये गांधीनगर येथून अमित शाहंच्या विरोधात माजी आमदार डॉ. सी.जे चावडा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. वाचा सविस्तर : 


३.काँग्रेसचा जाहीरनामा देशद्रोह्य़ांना खुश करणारा
काँग्रेसचा जाहीरनामा देशद्रोह्य़ांना खुश करणारा आहे, अशी टीका केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी मंगळवारी येथे केली. वाचा सविस्तर : 

४. वयचोरी करणाऱ्या खेळाडूंवर बंदी घाला!
वयचोरी करणाऱ्या खेळाडूंवर भारतीय बॅडमिंटन महासंघाने बंदी घालावी, जेणेकरून चुकीचे काम करणाऱ्या खेळाडूंवर वचक बसेल आणि भविष्यात चांगले परिणाम दिसून येतील, अशी मागणी भारताचे मुख्य राष्ट्रीय प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी केली आहे. वाचा सविस्तर :


५. चेन्नईचा विजयरथ मुंबई रोखणार?
अनुभवी आणि चाणाक्ष महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज संघ यंदाही विजेतेपदाच्या दिशेने दमदार वाटचाल करत असून त्यांनी सलग तीन सामने जिंकले आहेत. मात्र बुधवारी वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग क्रिकेटमधील साखळी सामन्यात मुंबई इंडियन्स त्यांचा हा विजयरथ रोखू शकतो, याची खुद्द चेन्नईला जाणीव आहे. वाचा सविस्तर :