१. हर्षवर्धन जाधव यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल
कन्नड मतदारसंघातील अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याची नोंद घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाचा सविस्तर : 


२.श्रीराम जन्मस्थानाचा नकाशा फाडणाऱ्या वकिलावर कारवाईची मागणी
अयोध्या वादात सर्वोच्च न्यायालयात मुस्लीम पक्षांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील राजीव धवन यांनी बुधवारी भर न्यायालयात भगवान श्रीरामाचे जन्मस्थान दाखवणारा चित्रमय नकाशा फाडून टाकण्याचे जे ‘अत्यंत अनैतिक कृत्य’ केले, त्याबद्दल बार कौन्सिलने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी या प्रकरणातील एका हिंदू पक्षाने केली आहे.
वाचा सविस्तर : 


३.भारत दौऱ्यासाठी बांगलादेशच्या टी-२० संघाची घोषणा
बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या निवड समितीने आगामी भारत दौऱ्यासाठी बांगलादेशच्या टी-२० संघाची घोषणा केली आहे. या दौऱ्यात बांगलादेशचा संघ भारताविरुद्ध ३ टी-२० आणि २ कसोटी सामने खेळणार आहे. तमिम इक्बाल आणि सौम्या सरकार या दोन्ही अनुभवी खेळाडूंनी भारताविरुद्ध मालिकेत संघामध्ये पुनरागमन केलं आहे. ३ नोव्हेंबरपासून या दौऱ्याला सुरुवात होणार असून पहिला टी-२० सामना दिल्लीत खेळवला जाणार आहे. वाचा सविस्तर : 

४. सुनील तटकरे पक्षप्रवेशासाठी मातोश्रीभोवती घिरट्या घालत होते; अनंत गीतेंचा दावा

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अनंत गीते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्याबाबत मोठा दावा केला आहे. शिवसेना प्रवेशासाठी सुनील तटकरे अनेकदा मातोश्रीभोवती घिरट्या घालत होते, असा दावा गीते यांनी केला आहे. तसंच त्यापूर्वी त्यांनी भाजपा प्रवेशासाठी नितीन गडकरी यांची भेट घेतली होती. परंतु त्या ठिकाणी काही झालं नाही. त्यामुळेच त्यांनी शिवसेनेकडे आपला मोर्चा वळवला असल्याचं त्यांनी सांगितलं. वाचा सविस्तर :

५. ‘या’ सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा नवरा परदेशात विकतो दिवाळीचा फराळ आज कलाविश्वामध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी कलाविश्वाशी काडीमात्र संबंध नसलेल्या व्यक्तींशी संसार थाटला आहे. यामध्ये माधुरी दीक्षित, स्वप्नील जोशी आणि किशोरी गोडबोले यासारख्या कलाकारांचा समावेश आहे. माधुरी दीक्षितचे पती परदेशातील एक नामवंत डॉक्टर आहेत. तर किशोरी गोडबोलेचे पती चक्क परदेशामध्ये दिवाळीचा फराळ विकतात. विशेष म्हणजे परदेशामध्ये त्यांच्या फराळाला प्रचंड मागणी असल्याचं पाहायला मिळतं. वाचा सविस्तर :