१. दत्तक गावांनी पालकांना नाकारले; फडणवीस, गडकरींच्या गावात भाजपा पराभूत
नागपूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ३७४ जागांपैकी भारतीय जनता पक्षाने २१८ ठिकाणी जागा मिळवल्या. पण केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दत्तक घेतलेले पाचगाव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेले फेटरी या दोन गावात भाजपाला पराभव धक्का बसला. इतकेच नव्हे तर गडकरी यांचे मूळ गाव असलेल्या धापेवाडा येथेही भाजपला पराभव स्विकारावा लागला. वाचा सविस्तर :

२. औषधविक्रेत्यांचा आज देशभरात बंद
केंद्र सरकारने प्रस्तावित केलेल्या ऑनलाइन औषधविक्रीच्या मसुद्याला विरोध करत ऑल इंडिया केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनने २८ सप्टेंबर रोजी बंद पुकारला आहे. त्यामुळे आज देशभरातील औषधे दुकाने बंद राहणार आहेत. वाचा सविस्तर :

३. शरद पवारांकडून केंद्र सरकारचे कौतुक
केंद्र सरकारने साखर उद्योगासाठी जाहीर केलेले ‘पॅकेज’ साखर कामगार आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी हिताचे आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी केंद्र सरकारचे गुणगान गायले. खनिज तेलाच्या आयातीमुळे केंद्र सरकारला झळा पोहोचत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीवर भर दिला असून इथेनॉलच्या धोरणातही बदल केला आहे. त्यामुळे आगामी काळात सर्व साखर कारखान्यांमध्ये इथेनॉल निर्मितीचे प्रकल्प सुरू करावेत, असा सल्लाही पवार यांनी साखर उत्पादकांना दिला. वाचा सविस्तर :

शरद पवार

४. घटनादुरुस्तीच्या पेचात संमेलनाध्यक्षपदाची प्रतिष्ठा धोक्यात
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष हा निवडणुकीद्वारे न निवडता सन्मानपूर्वक निवडला जावा, असे मत एकूणच मराठी साहित्य विश्वाचे आहे. परंतु हा बदल घटनादत्त मार्गाने व सर्वसंमतीने होणे गरजेचे आहे. यासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने पुढाकार घेऊन घटनादुरुस्तीचा प्रस्ताव आणला आणि ९३ व्या म्हणजे २०१९ मध्ये होणाऱ्या साहित्य संमेलनाचा अध्यक्ष सन्मानपूर्वक व सर्वसहमतीने निवडला जाईल, यासाठी प्रयत्न सुरू केले. हे प्रयत्न अभिनंदनीयच आहेत. परंतु महामंडळाच्या अध्यक्षांनी पूर्वघोषित निवडणूक मागे घेतल्याने व या घाईत घेतलेल्या निर्णयाला काही घटक संस्थांचा विरोध असल्याने घटनात्मक पेच निर्माण झाला असून संमेलनाध्यक्षपदाची प्रतिष्ठाच धोक्यात आली आहे. वाचा सविस्तर :

५. पेट्रोल 22 आणि डिझेल 19 पैशांनी महागले
आठवड्याच्या सुरुवातीला दरवाढीचा झटका देणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलमध्ये दोन दिवसांच्या ब्रेकनंतर आज पुन्हा एकदा वाढ झाली आहे. पेट्रोल 22 पैसे तर डिझेल 19 पैशांनी महागलं आहे. पेट्रोलने आधीच नव्वदी पार केली असून लवकरच शंभरी गाठेल अशी भीती सर्वसामान्यांकडून व्यक्त केली जात आहे. वाचा सविस्तर :

पेट्रोल- डिझेल