News Flash

मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या

वाचा सकाळच्या महत्वाच्या बातम्या

१. सरकारपुढे अन्नधान्य महागाईचे आव्हान!
रोडावलेली रोजगारनिर्मिती, मंदावलेला आर्थिक विकासदर आणि अमेरिकेने काढून घेतलेला विशेष व्यापार दर्जा यापाठोपाठ अन्नधान्य महागाई हे सरकापुढील आणखी एक आव्हान ठरणार आहे. रिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या गुरुवारी होणाऱ्या आढावा बैठकीत व्याजदरांमध्ये कपात केली जाण्याची अपेक्षा असताना अन्नधान्य महागाई ही त्यापुढील मोठी अडचण असणार आहे. वाचा सविस्तर : 

२. Cricket World Cup 2019 : झुंजार बांगलादेशचा आफ्रिकेला हादरा
अनुभवी डावखुरा गोलंदाज मुस्तफिजूर रेहमानची भेदक गोलंदाजी तसेच शकिब अल हसन आणि मुशफिकर रहिम यांच्या जोडीने साकारलेल्या शतकी भागीदारीच्या बळावर बांगलादेशने रविवारी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेला २१ धावांनी पराभूत केले. वाचा सविस्तर : 

३. तपासाबाबत तडवी कुटुंबीय साशंक
तपास यंत्रणेतील बदल आणि विशेष सरकारी वकिलाच्या नियुक्तीवरून डॉ. पायल तडवी कुटुंबीय साशंक आहेत. डॉ. पायल यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांना शासन होईल का, हा प्रश्न कुटुंबाच्या मनात घर करून आहे. वाचा सविस्तर : 

४. म्हाडाची सोडत जाहीर, २१७ जणांचे गृहस्वप्न साकार
म्हाडातर्फे २१७ सदनिकांची सोडत रविवारी पार पडली. यावेळी बहुतांश अर्जदारांनी सोडतीची माहिती म्हाडाच्या संकेतस्थळावरून घेणे पसंत केले. त्यामुळे ६६ हजारांवर अर्जदार असले तरी म्हाडाच्या वांद्रे येथील मुख्यालयात तुरळक गर्दी दिसली. वाचा सविस्तर : 

५. ‘भाजप-शिवसेनेला विधानसभेसाठी समान जागा’
राज्यात होणाऱ्या आगामी विधानसभेतही भाजप व शिवसेनेची युती कायम राहणार आहे. विधानसभेच्या २८८ जागांपैकी भाजप व शिवसेना प्रत्येकी १३५ जागांवर लढणार आहे. तर, महायुतीतील घटक पक्षांना उर्वरित म्हणजे १८ जागा देण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे दिली. वाचा सविस्तर : 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2019 7:41 am

Web Title: top five morning news bulletin food inflation rbi bjp
Next Stories
1 संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आज सियाचेनमध्ये
2 सरकारपुढे अन्नधान्य महागाईचे आव्हान!
3 अमेरिकेचे व्हिसा धोरण कडक
Just Now!
X