१. टीम इंडियाचा विंडीजवर दणदणीत विजय; मुंबईकर रहाणे सामनावीर
टीम इंडियाने पहिल्या कसोटी सामन्यात यजमान विंडीजला तब्बल ३१८ धावांनी पराभूत केले आणि मोठा विजय संपादन केला. ४१७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजचा दुसरा डाव केवळ १०० धावांमध्ये आटोपला. जसप्रीत बुमराहने ५ आणि इशांत शर्माने ३ बळी घेत भारताला विजय मिळवून दिला. दमदार फलंदाजी करणाऱ्या अजिंक्य रहाणेला सामनावीर घोषित करण्यात आले. वाचा सविस्तर :

२. संपत्तीविषयी बिग बींनी घेतला महत्वाचा निर्णय, करणार ‘या’ व्यक्तींच्या नावावर
अभिनयाच्या जोरावर प्रसिद्धी आणि संपत्ती मिळविलेला अभिनेता म्हणजे अमिताभ बच्चन. आज अभिनयामुळे विशेष ओळखले जाणारे बिग बी अनेक वेळा त्यांच्या लक्झरी लाईफ आणि संपत्तीमुळेही चर्चेले जातात. जवळपास २०० चित्रपट करणारे बिग बी यांनी आजवर अमाप संपत्ती कमावली आहे. सध्या बिग बी छोट्या पडद्यावरील ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत असून या सेटवर त्यांनी संपत्ती कोणाच्या नावावर करणार हे जाहीर केलं आहे. वाचा सविस्तर : 

३. पाकिस्तानने जादा पाणी सोडल्याने पंजाबमध्ये पुराचा धोका
पाकिस्तानने भारतीय क्षेत्रात पाणी सोडल्यामुळे सतलज नदीच्या पाणलोट क्षेत्रातील एका बंधाऱ्याचा काही भाग वाहून गेल्यानंतर पंजाबच्या सीमेवरील फिरोझपूर जिल्ह्य़ात पुराचा धोका निर्माण झाला आहे. वाचा सविस्तर : 


४. पोलीस दलात १२ हजार होमगार्ड
राज्यातील पोलिसांना साहाय्यभूत ठरणाऱ्या गृहरक्षक दलाला अधिक सक्षम करण्यासाठी राज्य शासनाने पावले उचलण्याचे ठरविले आहे. या जवानांचा राज्यातील पोलिसांसाठी वापर करून घेण्याचेही ठरविण्यात आले आहे. राज्य पोलीस दलाच्या मदतीसाठी १२ हजार जवान कायमस्वरूपात पुरविण्यात आले आहेत. प्रत्येक जवानाला वर्षांतून किमान २०० दिवस रोजगार देण्याचाही प्रयत्न केला जाणार आहे. वाचा सविस्तर : 

५. कोकण मार्गावरील वेळापत्रक सुरळीत ठेवण्याचे आव्हान
यंदा गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्यांचा प्रवास सुकर होण्यासाठी २१० विशेष फेऱ्या सोडण्यात येणार आहेत. मोठय़ा प्रमाणात धावणाऱ्या विशेष फेऱ्या आणि नियमित गाडय़ांमुळे कोकण रेल्वे मार्गावरील वेळापत्रक सुरळीत ठेवण्याचे आव्हान असेल. विशेष फेऱ्यांव्यतिरिक्त मेल-एक्स्प्रेस, पॅसेंजर गाडय़ांना ६४७ अतिरिक्त डबेही जोडले असून दादर-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसला ३० ऑगस्टपासून थांबा देण्यात येईल. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय टळेल. वाचा सविस्तर :