१. ‘एनआरसी’मध्ये नाव नसल्यास कायदेशीर मदत
राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीची (एनआरसी) अंतिम यादी शनिवारी प्रसिद्ध होणार असल्याच्या पाश्र्वभूमीवर आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी राज्यातील जनतेला न घाबरण्याचे आवाहन केले आहे. जे खरोखरच भारतीय आहेत त्यांचे नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी सरकारच्या वतीने आवश्यक ती सर्व पावले उचलण्यात येतील आणि गरिबांना कायदेशीर मदतही उपलब्ध करून दिली जाईल, असेही सोनोवाल यांनी स्पष्ट केले.वाचा सविस्तर : 

२. अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर कर्तारपूर मार्गिकेची पहिलीच बैठक
भारताने जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेताना अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतरची कर्तारपूर मार्गिकेबाबत तांत्रिक सोपस्कार पूर्ण करण्यासाठीची पहिली बैठक आज झाली. दोन्ही देशात तणाव असतानाही कर्तारपूर मार्गिकेचा प्रकल्प पुढे नेला जाईल, असे पाकिस्तानने आधीच स्पष्ट केले आहे. वाचा सविस्तर :

३. सामूहिक बलात्कार प्रकरण : तपास अहवाल सादर करण्याचे महिला आयोगाचे पोलिसांना आदेश
चेंबूर सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या मृत्यूनंतर या प्रकरणाची दखल राज्य महिला आयोगाने घेतली. या प्रकरणाचा तपास अहवाल शनिवारी सादर करा, असे आदेश आयोगाने चुनाभट्टी पोलिसांना दिले. गुन्ह्य़ात हत्येचे कलम जोडण्याची सूचनाही आयोगाने पोलिसांना केली. वाचा सविस्तर : 

४.‘सूरमा’नंतर तापसी साकारणार ‘या’ खेळाडूची भूमिका
२०१८-१९ या वर्षभरामध्ये अनेक नवनवीन चित्रपटांचा धडाका सुरु असतानाच आता आणखी एक नवीन चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित केले आहे. ‘बेबी’, ‘पिंक’, ‘नाम शबाना’ यासारख्या चित्रपटांमुळे प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री तापसी पन्नू या नव्या चित्रपटामध्ये झळकणार आहे. विशेष म्हणजे ‘सूरमा’ या चित्रपटातून हॉकीपटूची भूमिका साकारणारी तापसी पुन्हा एकदा खेळाडूच्या रुपात प्रेक्षकांना दिसणार आहे. वाचा सविस्तर : 

५. Ind vs WI: विराट, मयांकची अर्धशतकी खेळी; भारत मजबूत स्थितीत
भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान कर्णधार विराट कोहली आणि मयांक अग्रवालच्या अर्धशतकी खेळाच्या जोरावर भारताने 5 बाद 264 धावांची मजल मारली आहे. विंडीजचा कर्णधार जेसन होल्डरने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. भारताचे सलामीवीर लोकेश राहुल व मयांक यांनी सावध सुरुवात केल्यानंतर होल्डरने विंडीजला पहिले यश मिळवून दिले. वाचा सविस्तर :

फोटो सौजन्य: बीसीसीआय ट्विटर