१. आप आमदाराने कार्यालयातच केला महिलेवर बलात्कार, गुन्हा दाखल
दिल्लीतील रिठाला येथील आम आदमी पक्षाचे आमदार मोहिंदर गोयल यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेच्या पतीचे निधन झाले असून पेन्शनच्या कामानिमित्त ती गोयल यांच्या संपर्कात आली होती. गोयल यांनी कार्यालयातच माझ्यावर बलात्कार केल्याचा आरोप पीडित महिलेने तक्रारीत केला आहे. वाचा सविस्तर :
२.स्मिथ आणि वॉर्नरच्या पुनरागमनामुळे ऑस्ट्रेलिया संघ विश्वचषक जिंकू शकतो -वॉर्न
स्टीव्ह स्मिथ व डेव्हिड वॉर्नर या प्रमुख फलंदाजांच्या पुनरागमनामुळे ऑस्ट्रेलिया इंग्लंडमध्ये होणारा विश्वचषक जिंकू शकते, असे भाकीत माजी फिरकी गोलंदाज शेन वॉर्न याने बुधवारी व्यक्त केले. वाचा सविस्तर :
३. भारतात इंटरनेट सर्वात स्वस्त; १जीबी फक्त १८.५० रुपयात
जागतिक स्तरावर भारतातील इंटरनेट सेवा सर्वात स्वस्त असून देशात प्रति जीबीकरिता ग्राहकांना अवघे १८.५० रुपयेच मोजावे लागत आहे. जागतिक स्तरावर ही किंमत सरासरी प्रति जीबी तब्बल ६०० रुपये आहे. वाचा सविस्तर :
४. Photo : कर्करागावर मात केल्यानंतर सोनालीचे फोटोशूट, दाखवला २० इंचाच्या सर्जरीचा कट
कर्करोगावर उपचार घेण्यासाठी काही महिन्यांपासून न्यूयॉर्कमध्ये गेलेली प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रे भारतात आली आहे. भारतात परतल्यानंतर सोनालीने कॅन्सरचं निदान ते तिच्यावर करण्यात आलेल्या सर्जरीपर्यंतच्या प्रवासाचे अनुभव शेअर केले होते. त्यानंतर तिने एक फोटोशूट करुन आपल्या सर्जरीची जखम दाखविली आहे. वाचा सविस्तर :
५. दानवे-खोतकर यांच्यातील तिढा ‘मातोश्री’वर सुटणार!
जालना लोकसभा मतदारसंघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याविरोधात दंड थोपटून उभे ठाकलेले दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी बुधवारी ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापुढे दानवे यांनी शिवसैनिकांना दिलेल्या त्रासाचा पाढा वाचला. वाचा सविस्तर :
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 7, 2019 9:45 am