27 May 2020

News Flash

मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या

वाचा सकाळच्या महत्वाच्या बातम्या

१.“काँग्रेस, राष्ट्रवादी थकलेले घोडे; त्यांच्यावर ‘जॅकपॉट’ लागत नाही”
माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशिलकुमार शिंदे यांच्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावरून बऱ्याच चर्चांना ऊत आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही धुळ्यातील प्रचार सभेत या विधानावरून काँग्रेसवर लक्ष्य केले. त्यानंतर आता भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेनंही काँग्रेस-राष्ट्रवादीला थकलेल्या घोड्यांची उपमा दिली आहे. वाचा सविस्तर :

२. आरे वृक्षतोड प्रकरण : पोलीस अत्याचाराच्या चौकशीची ‘आप’ची मागणी
‘आरे’मधील कारशेडच्या जागेवरील झाडे तोडण्यास विरोध करणाऱ्या पर्यावरणप्रेमींवर पोलिसांनी केलेल्या अन्यायकारक कारवाईची चौकशी करण्याची मागणी आम आदमी पार्टीने (आप) केली आहे. ‘पोलीस परिमंडळ- १२’चे अधिकारी तसेच इतर पोलीस अधिकाऱ्यांच्या वागणुकीबद्दल या पत्रात निषेध करण्यात आला आहे. वाचा सविस्तर : 


३. विराट पाकिस्तानात खेळ! चाहत्याची ट्विटरवर मागणी…
मुंबईत झालेल्या २६/११ च्या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये होणाऱ्या क्रिकेट मालिका बंद झाल्या आहेत. जोपर्यंत पाकिस्तान अतिरेकी संघटनांवर कारवाई करत नाही, तोपर्यंत भारत क्रिकेट खेळणार नाही अशी भूमिका केंद्र सरकारने घेतली. मात्र पाकिस्तानच्या एका चाहत्याने चक्क विराट कोहलीला पाकिस्तानात क्रिकेट खेळण्याची विनंती केली आहे. वाचा सविस्तर :

४.Video : रेखा यांच्यावर चित्रीत झालेली ‘ही’ १० अविस्मरणीय गाणी
बॉलिवूडची एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा यांचा आज वाढदिवस १० ऑक्टोबर १९५४ ला तामिळनाडूतील चेन्नईमध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांचं खरं नाव भानुरेखा गणेशन. आरसपानी सौदर्यांची देणगी लाभलेल्या रेखा एक उत्तम अभिनेत्री आणि नृत्यांगनाही आहेत. वाचा सविस्तर :  


५. चीन-पाकच्या काश्मीरवरील चर्चेवर भारताचा आक्षेप
चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग शुक्रवारी भारत दौऱ्यावर येणार असल्याचे भारतासह चीनने बुधवारी अधिकृतपणे जाहीर केल्यानंतर काही तासांतच काश्मीरच्या मुद्यावरून उभय देशांदरम्यान तणावाचे चित्र निर्माण झाले. जिनपिंग आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यातील बैठकीत काश्मीरचा मुद्दा उपस्थित करण्यात आल्याने भारताने त्यास आक्षेप घेतला. वाचा सविस्तर :

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 10, 2019 9:22 am

Web Title: top five morning news bulletin india takes strong objection on china pakistan talks on kashmir ssj 93
Next Stories
1 VIDEO: ‘लिंबू-मिरची लावणारे देशाला काय प्रेरणा देणार’; मोदींचे भाषण व्हायरल
2 परदेश दौऱ्यानंतर राहुल गांधी महाराष्ट्र आणि हरियाणाच्या दौऱ्यावर
3 चीन-पाकच्या काश्मीरवरील चर्चेवर भारताचा आक्षेप
Just Now!
X