१.RBI चे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांचा राजीनामा
भारतीय रिझर्व्ह बँक अर्थात RBI चे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. विरल आचार्य यांनी त्यांचा निर्धारित कार्यकाळ पूर्ण होण्याच्या सहा महिने आधीच आपले पद सोडले आहे. विरल आचार्य यांची रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरपदी तीन वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली होती. २३ जानेवारी २०१७ ला त्यांनी पदभार स्वीकारला होता. वाचा सविस्तर : 

२. हॅटट्रीकनंतर शमीच्या पत्नीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाली, ‘माझी इतकीच इच्छा की…’
शनिवारी साऊदम्पटनच्या मैदानावर रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यात भारताने अफगाणिस्तानवर मात करत आपली विजयी घौडदौड कायम राखली. मोहम्मद शमीने अखेरच्या षटकात ३ बळी घेत हॅटट्रीकची नोंद केली. २०१९ विश्वचषक स्पर्धेत हॅटट्रीकची नोंद करणारा शमी पहिला गोलंदाज ठरला आहे. शमीच्या या कामगिरीवर त्याची पत्नी हसीन जहाँने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. वाचा सविस्तर : 

हसीन जहाँ मोहम्मद शमी[/caption]

३. Make In India: DRDO च्या शब्दानंतर भारताचा इस्त्रायल बरोबरचा ५० कोटी डॉलर्सचा क्षेपणास्त्र करार रद्द
डीआरडीओच्या आश्वासनानंतर भारताने इस्त्रायली कंपनी राफेल अॅडव्हान्स डिफेन्स सिस्टिमबरोबर केलेला ५० कोटी डॉलर्सचा स्पाइक क्षेपणास्त्र खरेदीचा करार रद्द केला आहे. स्पाइक हे रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था डीआरडीओने स्पाइकला पर्याय ठरणारे क्षेपणास्त्र दोन वर्षांच्या आत विकसित करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हा करार रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. वाचा सविस्तर :

४.मुख्यमंत्र्यांचा वर्षा बंगला ‘डिफॉल्टर’ यादीत, साडेसात लाखांचं पाणी बिल थकलं
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वर्षा बंगला मुंबई महापालिकेने डिफॉल्टर यादीत टाकला आहे. कारण या बंगल्याचं साडेसात लाखांचं पाणी बिल थकलं आहे. फक्त मुख्यमंत्रीच नाही तर इतर मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानांची ८ कोटी रूपयांची पाणी बिलं थकली आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मुंबई महापालिकेकडून पाणी बिल थकबाकीदारांची माहिती मिळवली होती. त्याद्वारे ही माहिती समोर आली आहे. वाचा सविस्तर : 

५. हक्काच्या जागेसाठी माजी सैनिकाचा संघर्ष
देशासाठी १९७१च्या युध्दात सहभागी झालेल्या आणि कामगिरी बजावताना जखमी झालेल्या माजी सैनिकाला हक्काच्या जागेसाठी संघर्ष करावा लागतो आहे. विठोबा मारुती परबळकर असे या माजी सैनिकाचे नाव आहे. शासनाने दिलेल्या आपल्या हक्काच्या जागेतील अतिक्रमण हटविण्यासाठी ते वयाच्या ७६ व्या वर्षी शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवत आहेत. वाचा सविस्तर :