१. …तर मोदी सरकार १३-१५ दिवसांत कोसळेल – पवार
नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तरी त्यांच्या सरकारची अवस्था १९९६च्या वाजपेयी सरकारसारखी होईल. हे सरकार अवघं १३ किंवा १५ दिवसांत कोसळेल असे भाकित राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना पवार यांनी भाकित वर्तवलं आहे. लोकसभा निवडणुकीचा अखेरचा टप्पा १९ तारखेला होणार आहे. वाचा सविस्तर : 

२. कौमार्य चाचणीला विरोध केल्याने अंत्ययात्रेवर बहिष्कार!
कौमार्य चाचणीवरून कंजारभाट समाजातील जातपंचायत वादाच्या भोवऱ्यात सापडली असतानाच अंबरनाथमधील एका तरुणाने अशा चाचणीला विरोध केला म्हणून समाजाने त्याच्यावर बहिष्कार टाकलाच, पण त्याच्या आजीच्या अंत्ययात्रेलादेखील हा बहिष्कार कायम राहिल्याने समाजाच्या मेलेल्या संवेदनेचेच दर्शन घडले आहे. वाचा सविस्तर : 


३.‘दहशतवादाला धर्म नसतो’, विवेक ओबेरॉयचा कमल हासन यांना टोला
हिंदू दहशतवादाबाबत केलेल्या विधानामुळे अभिनेता आणि मक्कल निधी मियाम पक्षाचे अध्यक्ष कमल हासन यांच्यावर सर्व स्तरांमधून टीका होत आहे. त्यातच आता बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी कमल हासन यांच्यावर टीका करायला सुरुवात केली आहे. ‘जसा कलाकाराला धर्म नसतो, तसाच दहशतवादालाही धर्म नसतो’, असं म्हणत अभिनेता विवेक ओबेरॉय यांनी कमल हासन यांना टोला लगावला आहे. वाचा सविस्तर : 

४. लवाद अधिकाऱ्यांसमोर सचिन-लक्ष्मणची साक्ष
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) लवाद अधिकारी डी. के. जैन यांच्यासमोर सचिन तेंडुलकर आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी हितसंबंधांच्या तक्रारीसंदर्भात साक्ष दिली. वाचा सविस्तर :


५. उत्तम दर्जाच्या दारूगोळ्याचा पुरवठा करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने हस्तक्षेप करावा
ऑर्डिनन्स फॅक्टरी बोर्डकडून (ओएफबी) लष्कराला पुरविण्यात येणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या दारूगोळ्यामुळे तोफखाना, रणगाडे यांच्या अपघातांचे प्रमाण वाढत असून या प्रकारांना आळा घालण्यासाठी तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी लष्कराने संरक्षण मंत्रालयाकडे केली आहे, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले. वाचा सविस्तर :