News Flash

मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या

वाचा सकाळच्या महत्वाच्या बातम्या

१. शिवरायांच्या महाराष्ट्राच्या अधोगतीची सुरुवात, शिवसेनेची फडणवीसांवर टीका
शिवसेना आमदार तुकाराम काते आणि दादर येथील फुल बाजारात दिवसाढवळ्या झालेल्या गोळीबारावरुन शिवसेनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपावर टीकास्त्र सोडले आहे. नागपूरप्रमाणे मुंबईचीही कायदा-सुव्यवस्था ढासळल्याचा आरोप करत गुंड व गुन्हेगारांना घेऊन पक्ष विस्तार करणाऱ्यांकडून आणखी काय अपेक्षा करावी, असा टोलाही लगावला आहे. शिवरायांच्या महाराष्ट्राच्या अधोगतीची ही सुरुवात असून राज्याच्या भवितव्यासाठी हे चित्र चांगले नसल्याची खंत व्यक्त केली. वाचा सविस्तर :

 

२. धक्कादायक..! तोकड्या कपड्यांमुळे विद्यार्थिनीस केले नग्न, एसएनडीटीमधील घटना
एसएनडीटी विद्यापीठाच्या जुहू कॅम्पस येथील वसतिगृहाच्या वार्डनने विनयभंग केल्याचा गंभीर आरोप एका विद्यार्थिनीने केला आहे. येथील एका विद्यार्थीनीने तोकडे आणि बिनबाह्यांचे कपडे घातले म्हणून वसतिगृहाच्या वॉर्डनने मुलीला नग्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वसतिगृहाच्या वर्डनला निलंबित करण्यात आले आहे. वाचा सविस्तर :

 

३.पेसची वर्षांतील दुसऱ्या विजेतेपदास गवसणी
अनुभवाच्या बळावर आपण आजही अनेक स्पर्धामध्ये युवकांना हेवा वाटेल, अशी कामगिरी करू शकतो, हे भारतीय टेनिसपटू लिएण्डर पेसने रविवारी पुन्हा सिद्ध केले. मेक्सिकन सहकारी मिगुएल अँजेल रेईस व्हॅरेलासह पेसने सँटो डोमिंगो खुल्या टेनिस स्पर्धेतील पुरुष दुहेरीच्या विजेतेपदावर नाव कोरले. पेसचे हे वर्षांतील दुसरे विजेतेपद ठरले. वाचा सविस्तर  :

४. बिकानेरमधील भारत-पाक सीमेनजीक राजनाथ सिंह दसऱ्याला शस्त्रपूजन करणार

भारत-पाकिस्तान यांच्यातील बिकानेर नजीकच्या अतिशय संवेदनशील सीमेवर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह हे दसरा साजरा करणार असून तेथे शस्त्रपूजा करणार आहेत. केंद्र सरकारमधील वरिष्ठ मंत्र्यांनी भारत पाकिस्तान यांच्यातील सीमेनजीक जाऊन शस्त्रपूजा करण्याची ही पहिलीच वेळ असून राजनाथ सिंह हे सीमा सुरक्षा दलाच्या जवानांसमवेत दसरा साजरा करतील.

वाचा सविस्तर : 

५. पुतळ्याच्या उंचीवरून भांडण्यातच आम्हाला समाधान
दैनंदिन जीवनातील प्रश्नांनी हताश झालेल्यांसाठी गड-किल्ले प्रेरणास्त्रोत ठरू शकतात. मात्र पुतळे उभारण्याची स्पर्धा आणि पुतळ्याच्या उंचीवरून भांडणे करण्यातच आपण समाधान मानतो, अशी खंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी रविवारी व्यक्त केली. युवा पिढीत राष्ट्रीय चारित्र्याचे बीजारोपण करण्यात आपण कमी पडलो, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. वाचा सविस्तर :

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 15, 2018 8:19 am

Web Title: top five morning news bulletin krida news leander paes
Next Stories
1 पाहा… ४ कोटींच्या नोटा आणि ४ किलो सोन्यापासून सजलेले मंदिर
2 कुंभमेळा २०१९ : मोदी सरकारचा १५ हजार कोटींचा प्लॅन
3 बिकानेरमधील भारत-पाक सीमेनजीक राजनाथ सिंह दसऱ्याला शस्त्रपूजन करणार
Just Now!
X