१. दिल्लीमधील काश्मिरी विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण
पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यामुळे दिल्लीतील अनेक काश्मिरी विद्यार्थी भीतीच्या छायेत वावरत असून त्यांची सुरक्षा वाढवण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले आहे. वाचा सविस्तर :

२. ‘सीआरपीएफ’ च्या जवानाला पोलिसांकडून मारहाण?
बारामती तालुका पोलीस ठाण्यात सीआरपीएफच्या जवानाला पोलिसांकडून बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना रविवारी घडली. मात्र, या प्रकरणात जवान आणि पोलिसांकडून परस्परविरोधी दावे करण्यात येत असून, जवानाने पोलीस ठाण्यात गोंधळ घातल्याचा आरोप पोलिसांकडून करण्यात आला आहे. वाचा सविस्तर :

३.तीन वर्षांत हिवतापबळींचे प्रमाण राज्यात निम्म्यावर
गेल्या तीन वर्षांत मुंबईसह राज्यभरात हिवतापामुळे (मलेरिया) होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण निम्म्यावर आले असून रुग्णांची संख्याही ५५ टक्क्य़ांनी घटली आहे. मुंबई, ठाणे आणि गडचिरोली जिल्ह्य़ात हिवतापाच्या फैलावाचे प्रमाण कमी झाले असले तरी धोका टळलेला नाही, असे तज्ज्ञांचे निरीक्षण आहे. वाचा सविस्तर :

४. भावनाकांडाचे भय
जम्मू-काश्मिरातील ताज्या दहशतवादी हल्ल्यानंतर आपल्याला पाकिस्तानशी किमान तीन पातळ्यांवर दोन हात करावे लागतील. लष्करी, आर्थिक आणि राजनैतिक. हे तीनही पर्याय आणि त्यामुळे होणारे विविध परिणाम आदींचा विचार करणे आवश्यक आहे. वाचा सविस्तर :

५. ‘शहीदांचा बदला घेण्यासाठी भाजपाला मतं द्या म्हणणं हा मढ्यावरचं लोणी खाण्याचा प्रकार’
पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात चाळीस जवान शहीद झाले. आता भाजपाकडून असे सांगितले जाते आहे की काश्मीरमधील जवान शहीद झाले त्याचा बदला घ्यायचा असेल तर पुन्हा भाजपाला मतं द्या, कमळासमोरचे बटण दाबा, असा प्रचार सुरु करणं म्हणजे चाळीस जवानांच्या मढ्यावरचे लोणी खाण्यासारखा प्रकार आहे अशी घणाघाती टीका शिवसेनेने केली आहे. सामनाच्या अग्रलेखातून या सगळ्या प्रकारावर टीकास्त्र सोडण्यात आले आहे. वाचा सविस्तर :