१. भूसंपादनातून ‘समृद्धी’चा डाव!
महत्त्वाकांक्षी मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी भिवंडी, कल्याण आणि शहापूर तालुक्यांत ८० हेक्टर जमिनीचे भूसंपादन बाकी असून त्यात कोटय़वधींचा मोबदला उकळण्यासाठी अनेक प्रकल्पग्रस्तांनी रातोरात आपल्या ओसाड जमिनींवर ‘उद्योग’ उभे केले आहेत. सरकारी अधिकाऱ्यांच्या मेहेरबानीमुळे ही ‘औद्योगिक क्रांती’ साधल्याची चर्चा असून राज्य रस्ते विकास महामंडळाला मात्र या भूसंपादनात ७०० कोटी रुपयांचा नाहक भरुदड सोसावा लागणार आहे. वाचा सविस्तर :

२. विधानसभा निवडणूक: राजस्थान, तेलंगणध्ये मतदानाला सुरुवात
राजस्थान आणि तेलंगण या दोन राज्यात मतदानाला सुरुवात झाली आहे. मागच्या काही दिवसांपासून या दोन राज्यांमध्ये काँग्रेस, भाजप आणि टीआरएस या तीन पक्षांमध्ये जोरदार प्रचारयुद्ध रंगले होते. तेलंगणमध्ये ११९ तर राजस्थानमध्ये विधानसभेच्या १९९ जागांसाठी मतदान होणार आहे. तेलंगणमध्ये चंद्रशेखर राव यांच्या तेलंगण राष्ट्र समितीसमोर काँग्रेसचे आव्हान आहे तर राजस्थानमध्ये वसुंधरा राजे सरकारसमोर सत्ता टिकवण्याचे आव्हान आहे. वाचा सविस्तर :

३.मराठी चित्रपटांनी आयुष्यभर आई-वडिलांच्या गोड गप्पाच करायच्या का? प्रवीण तरडेंचा संताप
सध्या राज्यभरात ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. प्रवीण तरडे यांच्या लेखणीतून उभा राहिलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. प्रवीण तरडे यांनीच या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी पेलली आहे. शेतकरी, गुन्हेगारी आणि पोलीस यांच्यावर आधारित असणाऱ्या या चित्रपटातील संवाद विशेष गाजत आहेत. विशेष करुन तरुण वर्गाला हा चित्रपट प्रचंड आवडत आहे. चित्रपटाचा विषय आणि त्यातील संवाद पाहता सेन्सॉर बोर्डाने त्याला ‘अ प्रमाणपत्र’ दिलं आहे. यावर प्रवीण तरडे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. वाचा सविस्तर :

४. राज्याचा शेतकरी आक्रोश करीत आहे, हे राज्य कारभारास लांच्छन आहे – उद्धव ठाकरे<br />राज्यात शेतकऱ्यांनी आक्रोश करण्यास सुरुवात केली असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयच्या माध्यमातून सरकारवर ताशेरे ओढले आहेत. कर्जमाफी नाही की पीक विमा योजना नाही. कुठलीही मदत नाही, साहेब. आता मदत मिळाली नाही तर आम्ही सगळे आत्महत्या करू, साहेब…’’ केंद्रीय दुष्काळ पथकासमोर राज्याचा शेतकरी आक्रोश करीत आहे. हे राज्य कारभारास लांच्छन आहे अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे. शेतकरी संतापला आहे. वाचा सविस्तर :

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

५.बीसीसीआयने मला आयपीएल लिलावाच्या प्रक्रियेतून वगळलं, रिचर्ड मेडलींची स्पष्टोक्ती
आयपीएलच्या बाराव्या हंगामाचा लिलाव येत्या १८ डिसेंबरला जयपूरमध्ये पार पडला जाणार आहे. बीसीसीआयने लिलावाच्या तारखेची अधिकृत घोषणा काही दिवसांपूर्वी केली होती. या हंगामात एकूण ७० खेळाडूंचा लिलाव होणार आहे. मात्र गेली ११ वर्ष आयपीएलमध्ये खेळाडूंचा लिलाव करणारे रिचर्ड मेडली हे यंदाच्या हंगामात लिलावासाठी उपलब्ध नसणार आहेत. त्यांच्या जागेवर ह्युज ह्युज एडमेडेस हे बाराव्या हंगामाचा लिलाव करणार आहेत. एडमेडेस हे फाईन आर्ट आणि चॅरिटी ऑक्शनर म्हणून ओळखले जातात.
वाचा सविस्तर :