१. भारताचा आयातकर अमेरिकेसाठी जाचक, ट्रम्प यांची भूमिका
भारताने हार्ले डेव्हिडसन या मोटारसायकलसह अनेक अमेरिकी वस्तूंवर १०० ते १२० टक्के आयात शुल्क लावले आहे. मात्र हे आपल्याला मान्य नाही असे म्हणत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांची भूमिका जाहीर केली आहे. एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे. हार्ले डेव्हिडसन या मोटरसायकलसह अनेक अमेरिकी वस्तूंवर भारतात १०० टक्के आयातशुल्क आहे. वाचा सविस्तर : 

२. सुपरस्टार महेश बाबूच्या सावत्र आईचे निधन
दाक्षिणात्य चित्रपटांतील सुपरस्टार महेश बाबूची सावत्र आई विजया निर्मला यांचं बुधवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. त्या ७३ वर्षांच्या होत्या. विजया निर्मला या दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील नावाजलेल्या दिग्दर्शिका होत्या. वाचा सविस्तर :

३. World Cup 2019 : धोनीची चिंता करु नका, आम्ही त्याच्याशी बोलत आहोत !
२०१९ विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघासमोर आज वेस्ट इंडिजचं आव्हान असणार आहे. मँचेस्टरच्या मैदानावर हा सामना रंगणार आहे. भारताने आतापर्यंत या स्पर्धेत चारही सामन्यांत बाजी मारली असून भारताचा एक सामना पावसामुळे वाया गेला. अफगाणिस्तानविरुद्ध सामन्यात भारतीय संघाला विजयासाठी संघर्ष करावा लागला. फलंदाजीदरम्यान महेंद्रसिंह धोनी आणि केदार जाधव यांनी केलेल्या संथ फलंदाजीमुळे भारत सामन्यात मोठी मजल मारु शकला नाही. वाचा सविस्तर : 

४. Maratha Reservation: मराठा आरक्षणावर आज हायकोर्टात अंतिम निकाल
मराठा आरक्षणासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात आज अंतिम निकाल जाहीर केला जाणार आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भात न्यायालयात चार याचिका विरोधात आणि दोन याचिका समर्थनार्थ दाखल झाल्या आहेत. तर एकूण २२ हस्तक्षेप अर्ज दाखल झाले आहेत. ज्यामध्ये १६ अर्ज आरक्षणाच्या समर्थनात तर ६ अर्ज विरोधात आहेत असेही समजते आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. रणजीत मोरे आणि न्या. भारती डोंगरे यांचे खंडपीठ आज या प्रकरणी निर्णय देणार आहे. वाचा सविस्तर : 

संग्रहित छायाचित्र

५. घोषणा म्हणजे वचनपूर्ती नव्हे, अंमलबजावणीसाठी मैदानात उतरा
नुसत्या घोषणा म्हणजे वचनपूर्ती नाही, जी घोषणा झालेली आहे त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, असा आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे मंत्री, आमदारांना दिला. त्याचबरोबर ‘कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला’ हे शेतकऱ्यांना अडवणूक करणाऱ्यांना दाखवायचे आहे, असेही विधान उद्धव ठाकरे यांनी केले. वाचा सविस्तर :