१. रवींद्र मराठेंसह महाराष्ट्र बँकेचे तिन्ही अधिकारी दोषमुक्त
बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना नियमबाह्य़ कर्ज दिल्याप्रकरणी पोलिसांनी ठपका ठेवलेल्या ‘बँक ऑफ महाराष्ट्र’च्या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना विशेष न्यायाधीश डी. जी. मुरुमकर यांनी सोमवारी दोषमुक्त केले. या अधिकाऱ्यांना या खटल्यातून वगळण्याचे आदेश न्यायालयाने दिले. वाचा सविस्तर :

२. मोदींच्या राज्यात नोकऱ्या निर्मितीची परिस्थिती खूपच वाईट – अमर्त्य सेन
नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांनी रोजगार निर्मितीवरुन मोदी सरकारला लक्ष्य केले आहे. काँग्रेस नोकऱ्या निर्मितीमध्ये फार चांगली नव्हती. पण मोदी सरकारने परिस्थिती खूपच वाईट करुन ठेवली असे मत अमर्त्य सेन यांनी व्यक्त केले. देशातील आर्थिक असमानतेवर आरक्षण उत्तर असू शकत नाही असे अमर्त्य सेन म्हणाले. वाचा सविस्तर :

३. १०० ते २०० भारतीय असलेली नौका समुद्रात बेपत्ता
केरळच्या मुनामबाम बंदरातून १२ जानेवारीला भारतीय स्थलांतरीतांना घेऊन निघालेली मासेमारी नौका बेपत्ता झाली आहे. १०० ते २०० भारतीय या नौकेमध्ये आहेत. न्यूझीलंडच्या दिशेने ही नौका जात असावी असा भारतीय पोलिसांनी अंदाज व्यक्त केला आहे. नवी दिल्ली आणि तामिळनाडूमधील नागरीक या बोटीमध्ये आहेत. वाचा सविस्तर :

४. मुंबई-दिल्ली राजधानी स्वच्छतेत अव्वल
रेल्वे मंत्रालयाने राजधानी गाडय़ांच्या केलेल्या स्वच्छता सर्वेक्षणात मुंबई-दिल्ली राजधानी एक्स्प्रेसने पहिला क्रमांक पटकाविला आहे. स्वच्छतेत एकूण तीन प्रीमियम गाडय़ांनी टॉप १० मध्ये क्रमांक प्राप्त केल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली. वाचा सविस्तर :

(संग्रहित छायाचित्र)

५. पृथ्वी शॉचे पुनरागमनाचे संकेत, म्हणाला आयपीएलआधी फिट होईन !
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सराव सामन्यादरम्यान पायाला झालेल्या दुखापतीमुळे युवा मुंबईकर सलामीवीर पृथ्वी शॉला संघातलं आपलं स्थान गमवावं लागलं होतं. मात्र आगामी आयपीएल हंगामाआधी मी पूर्णपणे तंदुरुस्त होऊन पुनरागमनाचा प्रयत्न करेन असा विश्वास पृथ्वी शॉने व्यक्त केला आहे. तो India TV वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होता. वाचा सविस्तर :