१.World Cup 2019 : टीम इंडियामध्ये गटबाजी? निर्णय प्रक्रियेवरुन विराट-रोहितमध्ये मतभेद
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचं २०१९ विश्वचषक स्पर्धेतलं आव्हान अखेरीस संपुष्टात आलं आहे. न्यूझीलंडच्या संघाने भारतावर १८ धावांनी मात करत अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चीत केलं. भारतीय संघाच्या या पराभवानंतर साहजिकपणे, पराभवाची कारणं शोधण्याचा प्रयत्न केला जातोय. बीसीसीआयनेही भारतीय संघाच्या कामगिरीची दखल घेतली असून, प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली यांच्यासोबत क्रिकेट प्रशासकीय समितीचे अधिकारी बैठक घेणार आहेत. वाचा सविस्तर : 

२. टीम इंडियाच्या पराभवाबाबत विवेक ओबेरॉयने शेअर केलं GIF, चाहत्यांनी झापले
अभिनेता विवेक ओबेरॉय याने भारत विरूद्ध न्यूझीलंडचा जो विश्वचषकातला सामना रंगला होता त्याबाबत एक GIF ट्विट केले आहे. भारताचा या सामन्यात पराभव झाला त्यामुळे भारताचं विश्वचषकाचं स्वप्न भंगलं. १० जुलै रोजी झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने भारताचा १८ धावांनी पराभव केला. हा पराभव टीम इंडियाच्या आणि तमाम भारतीयांच्या मनाला बोचणी लावणारा ठरला. याचसंदर्भात अभिनेता विवेक ओबेरॉयने एक GIF शेअर केलं आहे. वाचा सविस्तर : 

३. बीफ सूप पितानाचा फोटो पोस्ट केल्याने मुस्लीम तरुणाला जमावाकडून मारहाण
बीफ सूप पितानाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्याचा प्रकार एका मुस्लीम तरूणाला चांगलाच भोवला आहे. कारण हा फोटो पोस्ट केल्यानंतर २४ वर्षांच्या या तरुणाला मारहाण करण्यात आली आहे. पोलिसांनी शुक्रवारी या संदर्भातली माहिती दिली असून याप्रकरणी चौघांना अटक केल्याचेही स्पष्ट केले आहे. वाचा सविस्तर : 

४. WIMBLEDON 2019 : गवताच्या कोर्टवर फेडरर सरस; नदालला नमवून अंतिम फेरीत धडक
लंडनमध्ये सुरू असलेल्या विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेत जागतिक टेनिस क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असणाऱ्या दुसऱ्या मानांकित रॉजर फेडररने तिसऱ्या मानांकित स्पेनच्या राफेल नदालला ७-६(३), १-६, ६-३,६-४ असे पराभूत केले. फेडरर आणि नदालमध्ये पहिल्याच सेटमध्ये चुरस निर्माण झाली होती. मात्र फेडररने हा सेट १ गुणाच्या फरकाने जिंकला आणि नंतरच्या तीनही सेटमध्ये आघाडी कायम ठेवली. वाचा सविस्तर :

५. Mumbai FYJC admissions : अकरावीची पहिली प्रवेश यादी नव्वदीपार
राज्य मंडळाचा निकाल घटूनही यंदा नामांकित महाविद्यालयांत अकरावीच्या पहिल्या यादीतील प्रवेश पात्रता (कट ऑफ) गुण नव्वद टक्क्यांपेक्षा अधिक आहेत. वाणिज्य शाखेतील प्रवेशासाठी अधिक स्पर्धा दिसत आहे. पहिल्या यादीत अर्ज केलेल्या ७२ टक्के विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले आहेत. वाचा सविस्तर :