21 August 2019

News Flash

मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या

वाचा सकाळच्या महत्वाच्या बातम्या

१. ‘म्हाडा’ची लॉटरी कुणाला? आज 217 सदनिकांसाठी सोडत
मुंबईत ‘म्हाडा’च्या घरांसाठी अर्ज भरणाऱ्यांची प्रतीक्षा आज संपणार आहे. ‘म्हाडा’च्या मुंबईतील 217 घरांसाठी आज सोडत काढली जाणार आहे. या सोडतीचे थेट प्रक्षेपण ‘म्हाडा’च्या वेबसाईटवरून केले जाणार आहे. 217 सदनिकांसाठी सुमारे 66 हजार जणांनी यावेळी अर्ज केले होते. यंदाच्या सोडतीमध्ये अल्प उत्पन्न गटासाठी चेंबुरच्या सहकार नगरमधील 170, तर मध्यम उत्पन्न गटासाठी 47 सदनिकांचा समावेश आहे. वाचा सविस्तर : 


२.अडसुळांच्या पराभवामागे भाजपच्या नेत्यांचा हात
अमरावती लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांच्या पराभवामागे भाजपचाच हात असल्याचा आरोप आनंदराव यांचे पुत्र आणि माजी आमदार अभिजीत अडसूळ यांनी केला आहे. भाजपच्या जिल्हाध्यक्षांची पैशांच्या व्यवहाराबद्दलची ध्वनिफित ‘व्हायरल’झाली होती. तसेच भाजपचे अनेक नगरसेवक मतदानाच्या वेळी बेपत्ता होते, असेही अभिजीत अडसूळ यांचे म्हणणे आहे. वाचा सविस्तर :

३.वर्ल्ड कप कोण जिंकतलो?.. भारतच!
‘‘तात्यानूं ह्य काय माका पटना नाय! वर्ल्ड कपचो विषयच असो असा की मिया माज्या बापाशीचा पन ऐकूचंय नाय’’ कपाळावर आलेली केसांची झुलपे डाव्या हाताने बाजूला सारत उजव्या हाताची बोटे तात्यांच्या दिशेने नाचवित गण्या कुडाळकर तावातावाने भांडत होता. वाचा सविस्तर :


४.विद्यार्थ्यांमधील स्थूलता नियंत्रणासाठी आहार तपासणी
शाळा आणि महाविद्यालयांच्या उपाहारगृहावर आता अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) नियंत्रण असणार आहे. अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने नेमून दिलेली मार्गदर्शक तत्त्वे राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना प्रशासनाकडून पाठविण्यात येणार असून डिसेंबर महिन्यापर्यंत याची अंमलबजावणी करणे बंधनकारक असणार आहे. वाचा सविस्तर : 


५.पाच दिवस उष्णतेचा कहर..
तीव्र उष्म्यामुळे तापलेल्या महाराष्ट्रामध्ये सध्या पूर्वमोसमी पावसासाठी पोषक स्थिती निर्माण झाली असून येत्या पाच दिवसांत राज्यात काही ठिकाणी उष्ण लहरींचा तडाखा बसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. देशातील अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट आली असून, राजस्थानच्या चुरू शहरात शनिवारी पाऱ्याने ५० अंशांचा आकडा ओलांडला.वाचा सविस्तर : 

First Published on June 2, 2019 9:28 am

Web Title: top five morning news bulletin mumbai mhada lottery for 217 flats