07 March 2021

News Flash

मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या

वाचा सकाळच्या महत्वाच्या बातम्या

टॉप ५

१.मनसे नेते नितीन नांदगावकरांना तडीपारची नोटीस
मुंबई पोलिसांनी मनसे वाहतूक सेनेचे सरचिटणीस नितीन नांदगावकर यांना दोन वर्षे तडीपारची नोटीस बजावली आहे. मुंबईसह उपनगरातून त्यांना तडीपार करण्याची नोटीस बजावली आहे. पासपोर्ट घोटाळा, ड्रग्स विकणारी टोळी, रिक्षा चालकांची दादागिरी नांदगावकर यांनी उघड केली होती. त्यासाठी कायदा हातात घेतल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. वाचा सविस्तर :

२.पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळण्यावर दादा म्हणतोय…
जम्मू कश्मीरच्या पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी CRPF जवानांवर केलेल्या हल्याने संपूर्ण देशाला हादरुन सोडले. या हल्यानंतर देशात सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर क्रिकेट विश्वकरंडकात भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्ध खेळू नये अशी मागणी सर्व स्तरातून केली जात आहे. अनेक माजी क्रिकेटपटू आणि क्रिकेटचाहत्यांनीही पाकिस्तानविरुद्ध न खेळण्याची मागणी केली आहे. वाचा सविस्तर :

३.पुलवामा हल्ला ही माझी वैयक्तिक हानी – विकी कौशल

“पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यामुळे माझी वैयक्तिक हानी झाली आहे”, असं अभिनेता विकी कौशलने म्हटलं आहे. मुंबईत एका पुरस्कार वितरण कार्यक्रमात त्याने भारतीय जवानांविषयीच्या त्याच्या भावना व्यक्त केल्या. या सोहळ्यामध्ये विकीला पुरस्काराने गौरविण्यात आलं. वाचा सविस्तर : 

४.जैश-ए-मोहम्मद अजून मोठ्या हल्ल्याच्या तयारीत, गुप्तचर यंत्रणांचा इशारा

पुलवामा दहशतवादी हल्ल्यात यश मिळाल्याने जैश-ए-मोहम्मदने यापेक्षाही मोठा आत्मघाती हल्ला करण्याची योजना आखल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. १६ ते १७ फेब्रुवारीदरम्यान जैश-ए-मोहम्मदच्या प्रमुखांची आणि काश्मीरमधील दहशतवाद्यांमध्ये संभाषण झालं असून त्याआधारेच गुप्तचर यंत्रणांनी हा इशारा दिला आहे. वाचा सविस्तर :

५. राफेल विमाने खरेदी व्यवहारात कसलाही ‘घोटाळा’ झालेला नसल्याची ग्वाही या विमानांची उत्पादक कंपनी असलेल्या दसॉल्त अ‍ॅव्हिएशनच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी बुधवारी दिली. भारतीय वायुदलासाठी ज्या ११० विमानांसाठी सरकारने प्राथमिक निविदा जारी केली आहे, त्या विमानांसाठीही आपण शर्यतीत असल्याचे या कंपनीने सांगितले. वाचा सविस्तर :

(संग्रहित छायाचित्र)

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2019 9:44 am

Web Title: top five morning news bulletin mumbai police issues notice against mns nitin nandagaokar
Next Stories
1 जैश-ए-मोहम्मद अजून मोठ्या हल्ल्याच्या तयारीत, गुप्तचर यंत्रणांचा इशारा
2 भीषण ! बांगलादेशमध्ये आगीत होरपळून ५६ जणांचा मृत्यू
3 मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करा, UN मध्ये पाक विरोधात ४० देश एकवटले
Just Now!
X